Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अंत्यसंस्काराला २० तर दारूच्या दुकानासमोर २००० जणांना परवानगी, जावेद जाफरीने केले मजेशीर ट्विट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 5, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Javed Jafari
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्याकरिता एक नियमावली जाहीर केली. त्यानंतर सोशल मीडियावर याचे पडसाद उमटल्याचे दिसत आहे. अनेकजण या नियमांसदर्भात सोशल मीडियावर काही ना काही शेअर करताना दिसत आहेत. मग अश्यावेळी अभिनय क्षेत्राशी संबंधित कुणीच काहीच व्यक्त न होणे कसे चालेल? तर अभिनेता जावेद जाफरीने या संदर्भात एक मजेदार ट्वीट शेअर केले आहे. अंत्यसंस्काराला २० जण तर दारूच्या दुकानासमोर २००० जण उभे राहू शकतात, अश्या संदर्भाचे हे ट्विट आहे.

Guidelines for containment of COVID-19 #BreakTheChain pic.twitter.com/BLnOTaExc5

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 4, 2021

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने कडक निर्बंध लावण्याचे आदेश दिले असून त्यानुसार शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. मात्र खाजगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणे बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

Only in Bandra 😄 pic.twitter.com/buahy1RKWa

— Jaaved Jaaferi (@jaavedjaaferi) April 4, 2021

वांद्रे येथे राहणाऱ्या जावेदने या ठिकाणी लावण्यात आलेला ‘बांद्रा टाइम्स’ अशा मथळ्याखालील एका सूचना फलकाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. नव्या निर्बंधानुसार अंत्यसंस्काराकरीता २० जणांनाच उपस्थित राहण्यास परवानगी मिळणार आहे. तसेच दारुची दुकाने रात्री आठ वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत. या बोर्डवर लिहिण्यात आले आहे की, अंत्यसंस्काराला केवळ २० लोकं उपस्थित राहू शकतात कारण तिथे आत्म्याने म्हणजेच स्पिरिटने शरीरचा त्याग केलेला असतो. मात्र दारुच्या दुकानासमोर २००० लोकं रांगेत उभे राहू शकतात. कारण त्यांच्या शरीरामध्ये स्पिरीट जाणार असते. जावेदचे हे ट्वीट वाचून नेटिझन्स त्यावर मजेदार कमेंट करताना दिसत आहेत.

Tags: Bandra TimesCM Uddhav Thackreycovid 19javed jafariTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group