Take a fresh look at your lifestyle.

गाडीला धडक दिली म्हणून महेश मांजरेकरांनी चापट मारली ; सदर व्यक्तीकडून अदखलपात्र गुन्हा दाखल

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडीला धक्का लागला म्हणून महेश मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारली, अशी तक्रार कैलास सातपुते या व्यक्तीनं केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता पुणे-सोलापूर महामार्गावर घडली आहे.

महेश मांजेरकर यांच्या गाडीला पाठीमागून मारुती सुझुकी ब्रिझ्झा या गाडीने धडक दिली होती. त्यामुळे मांजरेकर हे बाहेर येऊन पाहणी करत होते. त्यावेळी झालेल्या वादात मांजरेकर यांनी आपल्याला शिवीगाळ करुन चापट मारली अशी तक्रार कैलास सातपुते नावाच्या व्यक्तीने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असणाऱ्या यवत पोलिसांकडे दिली आहे.

या तक्रारीवरून महेश मांजरेकर यांनी उजव्या गालावर चापट मारली व शिवीगाळ दमदाटी केली म्हणून त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे भा.द.वि 323 504 506 अन्वये अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा(NC) दाखल करण्यात आला आहे. तसंच, मांजरेकर यांनी दारू पिऊन चापट मारली, असं तक्रारदाराने त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील तक्रादार व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.