तुम्ही हो बंधू सखा तुम्ही! सोनू सूदच्या घराबाहेर गरजूंची गर्दी; व्हिडीओ झाला वायरल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोना काळात लोकांसाठी देवस्वरूपी धावलेला अभिनेता सोनू सूद आजही गरजूंसाठी दिवसरात्र खपतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोनू सूदने स्थलांतरित मजुरांना सुरक्षित त्यांच्या घरी त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवले होते. मात्र कोरोनाची हि दुसरी लाट आधीहून अधिक प्रलयकारी आहे. अश्या भीषण काळातही सोनू लोकांचे जीव वाचवताना दिसतोय. देशात ऑक्सिजन आणि बेड्सचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. दरम्यान सोनू व त्याची टीम गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्याचे, तसेच बेड्स उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. यामुळे लोकांसाठी सोनू आता भक्कम आधार असल्याचे वाटत आहे. परिणामी ऑक्सिजन व बेड्ससाठी वणवण भटकरणाऱ्या कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांनी त्याच्या घरासमोर गर्दी करणे सुरू केले आहे.
सध्या संपूर्ण राज्यात लोकडाऊन आहे. मुंबईत कडक लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र अशा परीस्थितीत लोक सोनूच्या घराबाहेर मदतीच्या आशेने त्याची वाट पाहत गर्दी करत आहेत. सोनूकडे नक्की मदत मिळेल, या आशेने काही लोक त्याच्या घरापर्यंत पोहोचले आहेत. अश्या भीषण काळात लोकांना आधार वाटणाऱ्या सोनूने पुन्हा एकदा आपल्या प्रखर व्यक्तिमत्व सिद्ध केले आहे. घरासमोर जमलेल्या लोकांना त्याने निराश न करता, त्यांच्या समस्या पूर्णपणे ऐकून आणि समजून त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
या व्हिडिओत मदतीच्या आशेने आलेले हे लोक सोनूला भरभरून आशीर्वाद देताना दिसत आहेत. आम्हा सर्वांचे आशीर्वाद व प्रार्थना तुमच्यासोबत आहेत सर, देव तुमचे भले करो, अशा शब्दांत हे लोक सोनूला आशीर्वाद देत आहेत. तूर्तास सोनूच्या घराबाहेरचा लोकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. काही तासांतच ७ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहून सोनूवर सर्व स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. इतकेच नव्हे तर त्याचे चाहते कमेंट करीत त्याचे कौतूक करीत आहेत तर काहींनी सोनू सूद पंतप्रधान हवा, अशी मागणी केली आहे.