Take a fresh look at your lifestyle.

..कारण आपलं नातं वेगळं आहे; “A फक्त तूच” या नव्या कोऱ्या चित्रपटातून चिन्मय – सुरुची देणार प्रेमाचे धडे

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मालिकांच्या माश्यामातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे कलाकार अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री सुरुची अडारकर आता लवकरच एका नव्याकोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. “A फक्त तूच” असे या चित्रपटाचे शीर्षक असून एका वेगळ्या नात्याची वेगळीच गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्ताचा वेळ साधून या चित्रपटाचं टीजर पोस्टर श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आलं. यावेळी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.

या पोस्टरमध्ये समुद्राची उसळलेली लाट, गुलाबाचं फुल हातात घेतलेल्या त्याच्या हातावर तिनं ठेवलेला हात असे दृश्य दिसत आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाची एक हटके टॅगलाईन आहे. हि टॅगलाईन अशी आहे कि, कारण आपलं नातं वेगळं आहे. त्यामुळे आता हि कथा रोमँटिक असली तरी इतरांसारखी नसणार असे म्हणायला हरकत नाही. कारण पोस्टर तर हेच सांगतय. जयदीप फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रंगनाथ बबन पाचंगे यांनी केले असून चित्रपटाची कथा त्यांचीच आहे. तर प्रफुल एस.चरपे यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. राजू भोसले हे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, मंगेश भिमराज जोंधळे हे कार्यकारी निर्माता तर रणजित माने यांनी छायांकन केले असून सागर गायकवाड यांनी कला दिग्दर्शनाची सूत्र सांभाळली आहेत.

या चित्रपटात चिन्मय उदगीरकर, सुरुची अडारकर यांच्यासह माधुरी पवार, शिल्पा ठाकरे, तेजस्विनी शिर्के, ऋषिकेश वाम्बूरकर, गीत निखारगे यांच्या भूमिका आहेत. प्रियांका दुबे यांनी वेशभूषा तर समीर कदम यांनी रंगभूषा सांभाळली आहे.