Take a fresh look at your lifestyle.

एक लाथ १००१ रुपयांची! अभिनेता विजय सेतुपतीला लाथ मारणाऱ्यास बक्षीस जाहीर; काय आहे प्रकरण?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय सेतूपती यांच्यावर हल्ला झाल्याची घटना अगदी काहीच दिवसांपूर्वी घडली होती. हा हल्ला अतिशय किरकोळ वाटत असला तरीही आता या प्रकरणाने काही वेगळेच स्वरूप धारण केले आहे. बंगळूरु विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीने दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपती यांच्यावर हल्ला केला होता. दरम्यान या घटनेचे भांडवल होऊ नये म्हणून या घटनेला किरकोळ म्हणत विजय सेतूपतीने हा विषय जागीच संपवला होता. मात्र, यानंतर आता हिंदू मक्कल काची नावाच्या एका गटाने विजय सेतुपतीला लाथ मारणाऱ्या इसमास तब्बल १००१/- रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

हिंदू मक्कल काची या अधिकृत ट्विटर हँडलने एका व्हिडीओचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये अभिनेता विजय सेतुपती यांनी स्वातंत्र्य सेनानी देवीथिरु पासुम्पोन मुथुरामलिंगा थेवर अय्या आणि देशाचा अपमान केला आहे असे म्हटले आहे. ‘अर्जुन संपतने तेवर अय्या यांचा अपमान केल्याबद्दल अभिनेते विजय सेतुपतीला लाथ मारणाऱ्यास रोख रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली आहे. जो पर्यंत विजय सेतुपती माफी मागत नाही, तोपर्यंत त्याला जे कुणी लाथ मारतील त्याला प्रत्येकी बक्षीस देण्यात येईल. १ लाथ = रु. १००१/- त्याला बक्षीस म्हणून दिले जातील,’ असे या ट्विटमध्ये पोस्ट करण्यात आलं आहे. आश्चर्य वाटणारे असले तरीही हेच सत्य आहे. एक लाथ हजाराची.

दरम्यान एका वृत्त वाहिनीशी बोलताना अर्जुन संपत यांनी आपण हे वक्तव्य केले असून व्हायरल व्हिडीओशी संबंधित असल्याचे मान्यदेखील केले आहे. इतकेच नव्हे तर अर्जुन संपत म्हणाले कि, ‘विजय सेतुपतीला लाथ मारण्याचा प्रयत्न करणार्‍या महा गांधी यांच्याशी मी बोललो. विजय सेतुपतीने व्यंग्य केल्यामुळे हा वाद झाल्याचे महा गांधीने सांगितले.’ अभिनेता विजय सेतुपती हा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. अलीकडेच त्याने थलपती विजय सोबत मास्टर हा चित्रपट केला होता. हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी विजय सेतूपतीच्या अभिनयाची तारीफ केली होती.