Take a fresh look at your lifestyle.

माधुरीसाठी अभिमानाचा क्षण..! मोठा मुलगा अरीन झाला ग्रॅज्युएट; सोशल मीडियावर केले कौतुक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षितचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ती सध्या जाम खुश आहे. म्हणा तिच्यासाठी कारणही तसेच खास आहे. माधुरीचा लाडका मोठा लेक ग्रॅज्युएट झाला आहे. माधुरीचा मुलगा अरीन नुकताच हायस्कूल ग्रॅज्युएट झाला आहे. माधुरीने ही आनंदाची बातमी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. सोबत कुटुंबाचा एक सुंदर फोटोही तिने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने लेकाचे तोंडभरून कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर तर हा क्षण अभिनयाचा असल्याचेही तिने म्हटले आहे.

माधुरीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये माधुरी, पती श्रीराम नेने, मुलगा अरिन आणि लहान मुलगा रयान देखील आहेत. हा एक सुंदर असा नेने फॅमिली फोटो आहे. ‘राम आणि माझ्यासाठी हि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की अरिन हायस्कूल ग्रॅज्युएट झाला आहे. अभिनंदन अरिन आणि २०२१ च्या संपूर्ण टीमचेही अभिनंदन. हे वर्ष सगळ्यांसाठीच अत्यंत कठीण होत पण तुमच्या मेहनतीला, चिकाटीला, जिद्दीला आमचा सलाम,’ असे लिहीत तिने हि पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. पुढे, प्रयत्न सोडू नका, स्वप्नांची कास धरा, एक दिवस तुमच्यामध्ये बदल घडवण्याची ताकद असेल, असे तिने पुढच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित- नेनेचा मोठा मुलगा अरिन आता पुढच्या शिक्षणासाठी विदेशात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. अलीकडे माधुरीचा पती डॉ. श्रीराम नेने यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले होते. कारण असे कि, शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम आदित्य ठाकरे यांनी सुरु केली होती, याचसाठी नेनेंनी त्यांचे आभार मानले होते. एक पालक म्हणून सामान्य माणसाइतकेच दिग्गज कलाकार देखील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांसाठी अत्यंत भावुक आणि काळजीवाहू असतात. आता अरीनच्या पुढील शिक्षणाबाबत माधुरी आणि श्रीराम यांचे काळजी करणे अत्यंत साहजिक आहे. मात्र या काळजीचे ओझे होऊ न देता लेकाच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्यासाठी आता श्रीराम आणि माधुरी सज्ज आहेत हे नक्की.