Take a fresh look at your lifestyle.

छत्रपती शिवाजी महाराजांवर येतेय मालिका, हा अभिनेता साकारणार छत्रपतींची भूमिका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर अनेक मालिका आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. काही वर्षांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवर छोट्या पडद्यावर छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावरील मालिका अत्यंत लोकप्रिय झाली. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपतींची मुख्य भूमिका भूषविली होती. आता पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनी अशीच एक ऐतिहासिक मालिका घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारलेलया या आगामी मालिकेत भूषण प्रधान हा प्रसिद्ध अभिनेता छत्रपतींच्या भूमिकेत दिसणार आहे.

नुकताच स्टार प्रवाह वाहिनीचा पहिल्यांदाच परिवार पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात भूषण प्रधान याने महाराजांवरील एक दर्जेदार परफॉर्मन्स दिला आणि येऊ घातलेल्या मालिकेविषयी प्रेक्षकांना सांगितले. इतर कलाकारांप्रमाणे भूषण देखील सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. काही दिवसांपूर्वी त्याने नव्या इनिंगविषयी एका पोस्ट मध्ये लिहिले होते. तसे पाहता या पोस्टमध्ये मालिकेचा उल्लेख नव्हता. मात्र मी आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा माझ्या आवडत्या माध्यमाकडे वळत असून मी त्यासाठी खूपच उत्सुक आहे असे त्याने पोस्टमध्ये लिहिले होते.

Jay Bhawani Jay Shivaji

सतरंगी रे’, ‘मिस मॅच’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास-2’, ‘कॉफी आणि बरंच काही’ अशा विविध सिनेमांमध्ये भुषणने विविध भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. पिंजरा या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मराठीत मिळालेल्या यशानंतर भुषण आता बॉलिवूडकडे वळला आहे. तो सिमी जोसेफ यांच्या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. अभिनेत्री रायमा सेनसोबत तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकताच त्याने इंस्टावर आपली आगामी मालिका जय भवानी जय शिवाजी मधील त्याचा फोटो पोस्ट केला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपतींच्या भूमिकेतील भूषण प्रेक्षकांना किती भावतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.