Take a fresh look at your lifestyle.

गौरीचं सत्य शालिनी समोर आणू शकेल..?; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेला अनोखे वळण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी प्रेक्षकांची अत्यंत लोकप्रिय वाहिनी ठरलेली स्टार प्रवाह वाहिनी सध्या टॉप ५ च्या रँक मध्ये आहे. इतकेच काय तर वाहिनीवरील मालिकाही तितक्याच लोकप्रिय आहेत. यापैकी एक म्हणजे लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’. सध्या या मालिकेचे कथानक अत्यंत रंजक वळण घेताना दिसत आहे. एकीकडे गौरीने वेष बदलून शिर्के पाटलांच्या घरात प्रवेश घेतला आहे. यानंतर तिने एकेकाला सुतासारखा सरळ करण्याची योजना आखली असून अद्याप कुणालाही ती गौरी असल्याची खात्री नव्हती. पण आता शालिनीसमोर हे सत्य उघडकीस आले आहे आणि यानंतर गौरीने शालिनीला आपण गौरी असल्याचे सिद्ध करून दाखव असे आव्हान दिले आहे.

गौरी वेश बदलून शिर्के पाटील यांच्या घरात राहत असून तिने घरातल्या सगळ्यांनाच चांगल धारेवर धरल्याचे पहायला मिळत आहे. गौरीने स्वतःचा वेष बदलण्यामागील कारण म्हणजे, तिला कड्यावरून ढकलण्यामागे नेमका कोणाकोणाचा हात आहे..? हे जाणून घेणे. या एकमेव करणासाठी तिने हा वेश धारण केला आहे. यात तिला माईंची साथ तर मिळाली आहे. पण आता शालिनीसमोर गौरी आणि माईंचा सगळा प्लॅन उघडकीस आला आहे. त्यामुळे शालिनी थोडीच गप्प बसणार. तिने शिर्के पाटलांना जमा करून गौरीचे सत्य उघडकीस आणायचे ठरवले.

आता शालिनीसमोर सगळं प्रकार उघडा झाल्यानंतर शालिनी तर पेटून उठली. इतकंच काय तर तिने घरातल्या प्रत्येकाला जमा करून गौरीचे सत्य सांगू पाहिले. यावर गौरीने शालिनीला थेट आव्हान दिलं की, “मीच जर खरी गौरी असेन तर ते सिद्ध करून दाखव!” आता असं ओपन चॅलेंज शालिनीला सोप्प पडतंय कि महागात हे तर पुढील भागातच कळेल. पण इतकं नक्की कि, गौरीचं सत्य समोर आणता आणता शालिनी आणि तिच्यासोबत देवकीला सळो का पळो अशी फिलिंग येणार आहे.