Take a fresh look at your lifestyle.

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याला सोनू निगमच्या सुरांची साथ; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या हटके अंदाज आणि युनिक आवाजामुळे सोनू निगम बॉलिवूड जगतातील अत्यंत लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. त्याचे अनेको चाहते त्याच्या नव्या गाण्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. तर सतत या ना त्या मुद्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या तसेच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ज्यांना मामी या नावाने सोशल मीडियावर ओळखले जाते त्यांचे आता एक नवे कोरे गाणे रिलीज झाले आहे. यंदा दिवाळीच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी आणखी एका गाण्याचं लॉन्चिंग केले आहे. यात महत्वाची बाब म्हणजे या गाण्यासाठी अमृता यांच्यासोबत सोनू निगा याने सप्तसूर छेडले आहेत.

यावेळी दिवाळीच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी महालक्ष्मी आरती गीत सादर केलेले आहे. ‘महालक्ष्मीजी की आरती, जो कोई नर गाता, उर आनंद समाता, पाप उतर जाता ! ॐ जय लक्ष्मी माता! असं या नव्या गाण्याचं नाव आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया ट्वीटरवर ट्विट करून हे गाणं लाँच केलं आहे. तसेच सोनू निगमनेही आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डलवरून या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

या गाण्याद्वारे पहिल्यांदाच अमृता फडणवीस आणि बॉलिवूड जगतातील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी एकत्र गाणे गायले आहे. या गाण्यात अमृता यांच्यासोबत सोनू निगम गाताना दिसत आहे. याआधीही अमृता फडणवीस यांनी गणपती, व्हेलटाईंन डे अश्या विविध दिवसांच्या निमित्ताने अनेक गाणी गायली आहेत.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गायनाची अत्यंत आवड आहे. यामुळे त्या शिवसेनेवर करीत असलेल्या टीकांइतक्याच त्यांच्या गाण्यांसाठीदेखील सतत चर्चेत असतात. त्यांच्या गाण्यांमध्ये त्यांनी छेडलेले सूर आणि ताल याबाबत सोशल मीडियावर त्या कायम चर्चेत दिसतात. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतसुद्धा अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. ‘फिर से’ असे या गाण्याचे नाव असून याचे लाँचिंग खुद्द अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईमध्ये करण्यात आले होते.