Take a fresh look at your lifestyle.

गंगीला भेटून चित्रा वाघ सुखावल्या; ‘..बदललीस गं..’,म्हणत लाडक्या मैत्रिणीसाठी केली खास पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नुकताच सुखद अनुभव घेतला आहे. हा अनुभव म्हणजे अचानक नकळतपणे काही वर्षांनंतर जुन्या मैत्रिणीची पडलेली गाठ. होय. गाढवाचं लग्न या मराठी लोकप्रिय कॉमेडी चित्रपटातील गंगी म्हणजेचं मराठमोळी अभिनेत्री राजश्री लांडगे आणि चित्रा वाघ यांची अचानक काहीही न ठरवता भेट झाली आहे आणि या दोघीही घट्ट मैत्रिणी आहेत. हि भेट सुखद धक्का देणारी निश्चितच होती. त्यामुळे या भेटीनंतर तू लय बदललीस गं गंगे म्हणत चित्रा वाघ यांनी भेटीचे काही फोटो आणि सुंदर छोटीशी पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘तू लय बदललीस गं गंगे…गाढवाचं लग्न या चित्रपटातील गंगी म्हणजेचं माझी मैत्रिण राजश्री लांडगे हिची जवळपास २ वर्षांनी अचानक सुखदं भेट नाशिकमध्ये. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला तरी प्रेक्षक आवडीनं पाहतात आणि खळखळून हसतातही….खुप शुभेच्छा “गंगी” तुला पुढील वाटचालीस. या पोस्टसह चित्रा वाघ यांनी गंगीसोबतचे काही सुंदर फोटोसुद्धा शेअर केले आहेत.

 

‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटामधील ‘गंगी’ हे पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात ‘गंगी’ ही व्यक्तिरेखा अभिनेत्री राजश्री लांडगेनेच साकारली होती. यात राजश्रीने दिग्गज अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत काम केले आहे. ‘गंगी’ या व्यक्तिरेखेसाठी तिची वेशभूषा, बोलण्याचा लहेजा गावरान आणि ठसकेबाज होता. तरीही तिने हि भूमिका इतकी उत्तम पार पडली कि तिच्या या भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक झाले. या चित्रपटातील गंगीच्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर अशी काही छाप पडली कि हा चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात. मात्र या चित्रपटानंतर प्रेक्षकांची लाडकी गंगी कुठे दिसेनाशीच झाली.