Take a fresh look at your lifestyle.

“रात्रीस खेळ चाले ३” या बहुचर्चित मालिकेचं लक्षवेधक होर्डिंग; तुम्ही पाहिलात का ?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले ३ हि मालिका नुकतीच सुरु झाली आहे. २ सीजन नंतर हा तिसरा सीजन देखील प्रेक्षकांची पसंती मिळवण्यास यशस्वी झाला आहे. या मालिकेतील नवनवीन रंजक वळणे प्रेक्षकांना मालिका पाहण्यास भाग पाडत असतात. तसेच आता या मालिकेचे एक नवे होर्डिंग पाहायला मिळत आहे. ज्या होर्डिंग ने साऱ्यांचेच लक्ष ओढून घेतले आहे. हे होर्डिंग फक्त रात्रीत काळोखानंतरच दिसते. हे होर्डिंग खऱ्या अर्थाने रात्रीस खेळ चाले या टायटल ला साजेसे आहे.

या मालिकेतील जवळ जवळ सारीच पत्रे प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आजही आधीच्या सिजनमधल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांवर सोडलेली छाप कायम आहे. खरतर सर्वच कलाकारांनी जीव ओतून आपल्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र तरीही सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती अण्णा आणि शेवंता या पात्रांना. मालिकेत माधव अभ्यंकर यांनी साकारलेले खलनायक अण्णा नाईक या पात्राने तर प्रत्येकाच्याच मनात भीती निर्माण केली होती. अण्णांचा दरारा आणि त्यांच्या बंदुकीचा निशाणा ह्यांनी प्रेक्षकांच्या मनात धडकीच भरली होती. तर अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेल्या शेवंता या पात्राने आपल्या दिलखेचक अडाणी प्रेक्षकांना नुसते वेड लावले होते. त्यामुळे मालिकेच्या तिस-या पर्वामध्ये कशी आणि कोणत्या रूपात अण्णा नाईक आणि शेवंता रसिकांच्या भेटीला येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या अण्णा नाईक आणि शेवंता कधी परतणार यांकडे सा-यांचे लक्ष लागलेले असताना, मालिकेचे हटके प्रमोशन करत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली जात आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या प्रमोशनसाठी ह्या आगळ्या वेगळ्या पोस्टरची कल्पना लढवली आहे. हे होर्डिंग फक्त रात्रीच दिसले असे बनवले गेले आहे. ‘जशी काही भूत रात्रीच दिसतात, तसेच या होर्डिंगवरचे अण्णा नाईक रात्रीच दिसतात’ असे म्हणत हटके प्रमोशन फंडा पाहायला मिळत आहे.

मागील दोन्ही पर्वाचे दिग्दर्शन राजू सावंत आणि लेखन प्रल्हाद कुडतरकर आणि राजेंद्र घाग यांनी केले होते. तिस-या पर्वासाठी देखील दिग्दर्शक, लेखक यांच्यासह सर्व कलाकारांची तीच टीम कायम ठेवण्यात आली आहे. फक्त मालिकेत अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारीने साकारलेली सुसल्याची भूमिका आता अभिनेत्री पौर्णिमा डे साकारत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.