Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आई कुठे काय करते’मधील संजना रुग्णालयात दाखल; हसतमुखाने करतेय आजारपणाशी दोन हात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 26, 2022
in बातम्या, Hot News, फोटो गॅलरी, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rupali Bhosale
0
SHARES
5.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या लाडक्या कलाकाराच्या आयुष्यात तो आनंदी आहे का..? तो व्यवस्थित आहे का..? आता तो काय करत आहे..? याबाबत अनेक चाहते जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे आपल्या लाडक्या कलाकाराविषयी कोणतीही बातमी ते दुर्लक्षित करत नाहीत. छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते..?’ हि मालिका अत्यंत मालिकांपैकी एक असून यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे लाडके आहे. या मालिकेतील संजना अर्थात अभिनेत्री रुपाली भोसलेचे निगेटिव्ह पात्र असूनही तिचा एक वेगळा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या रुपाली रुग्णालयात असून नुकतेच तिचे ऑपरेशन झाल्याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

सध्या रुपाली भोसले ठाण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तिची एक सर्जरी झाली असून तिनं आपल्या आजाराविषयीची माहिती देताना हॉस्पिटलच्या बेडवर आरामा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच लांबलचक पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे आणि आजारपणात काळजी घेणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका आणि हॉस्पिटल स्टाफचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय कि, ‘दुसऱ्यांची काळजी घेताना स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या शरीराची,आरोग्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. कारण ते जर सुदृढ असेल तरच आपण यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आपलं आयुष्य खूप अनिश्चित आहे, त्यात घडणारे अनेक प्रसंग कधी कधी न सांगता समोर उभे ठाकतात. पण त्या सगळ्या प्रसंगांचा,अडचणींचा सामना करताना डगमगायचं नाही आपण हसत हसत त्यांना सामोरं जायचं. कारण आयुष्य खूप सुंदर आहे.’

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

‘कालच माझं एक छोटंसं ऑपरेशन झालं. पण आता मी बरी होत आहे. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादासाठी आणि माझ्यावरील प्रेमासाठी मी आभारी आहे. अनेकदा आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो,आपलं शरीर आपल्याला सिग्नल देत असतं,काहीतरी बिघडलं आहे पण आपण त्या थोड्या दुखण्याचं मोठ्या दुखण्यात रुपांतर होईपर्यंत दुर्लक्ष करतो. म्हणूनच माझी सर्वांना मनापासून विनंती आहे की स्वतःची काळजी घ्या, कोणतंही छोटं दुखणं अंगावर काढू नका. डॉक्टरांना दाखवा, त्यांचा सल्ला घ्या, होऊ बरं म्हणून सोडून देऊ नका.’ हि पोस्ट शेअर केल्यानंतर रुपालीच्या अनेक चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तर अनेकांनी तिने लवकर बरे व्हावे म्हणून देवाकडे प्रार्थना केली आहे.

Tags: Aai Kuthe Kay KarteAdmitted In HospitalInstagram PostMarathi ActressRupali Bhosale
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group