Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मैत्रिणींनो जाग्या व्हा.. नाही म्हणायला शिका’; समस्त महिला वर्गाला अरुंधतीचा सल्ला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 4, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Madhurani Gokhale
0
SHARES
128
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाची गडबड सुरु होती. अखेर हा लग्न सोहळा पार पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नामूळे देशमुखांच्या घरात राडा सुरु होता. अनिरुद्धचा जळफळाट आणि विघ्न आणण्याची बुद्धी सतत वेदना देणारी ठरली. पण अनेक अडथळे येऊनही अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न झालंच. अनेकदा प्रेक्षकांनीही अनिरुद्धच्या वागण्यावर निषेध नोंदवला. अनेकदा प्रेक्षकांना मालिकेचे हे वळण कंटाळवाणेदेखील वाटले पण जेव्हा अरुंधतीने स्वतःच्या आयुष्याचा मार्ग निवडला तेव्हा मात्र प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. अखेर आता अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न झालंय. पण यादरम्यान अरुंधतीने महिला वर्गाला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by मराठी मनोरंजन विश्व (@marathimanoranjanvishwa)

सध्या सोशल मीडियावर अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अगदी ट्रेंड करत आहेत असे म्हटले तरीही चालेल. दरम्यान एका डिजिटल वाहिनीनं अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नानिमित्तानं केलेल्या मुलाखतीत अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरने समस्त महिला वर्गाला एक मोलाचा सल्ला दिला आहे. तिने थेट ‘मैत्रिणींनो जाग्या व्हा.. डोळे उघडून बघा’ म्हणत अतिशय योग्य आणि महत्वाच्या गोष्टीबाबत महिलांचे कान टोचले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

या व्हिडिओमध्ये ती म्हणतेय, ‘झोकून देऊन प्रेम करणं वेगळं आणि प्रेमात स्वतःला हरवणं वेगळं..अरुंधतीनं इतकी वर्ष अनिरुद्धच्या प्रेमात स्वतःला हरवलं आणि मग तिला कठीण गेलं स्वतःचं अस्तित्व शोधणं. तिला काय आवडतं. तिला काय वाटतं. मी कोण आहे. मी किती सहनशील असू शकते. मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की, मैत्रिणींनो,जाग्या व्हा..ठामपणे आपली मतं मांडायला शिका…जे आवडत नाही त्याला नाही म्हणायला शिका. तरच आयुष्याचा प्रवास सुखकर होईल. नाहीतर काहीही होणार नाही’.

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram PostMadhurani Gokhale-Prabhulkarstar pravahViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group