Take a fresh look at your lifestyle.

‘आई कुठे काय करते’ मालिकेची बाजी; अरुधंतीचा TRP’च्या स्पर्धेत पहिला नंबर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। TRP लिस्टमध्ये सर्वात वर म्हणजे पहिल्या नंबर वन राहण्यासाठी सर्व मालिका शर्यतीत असतात. जबरदस्त कथानक, तोडीचे कलाकार आणि लोकलक्षवेधी पोस्टर हे यांचे हुकमी एक्के. लोकप्रिय होऊन सर्वात जास्त TRP ओढण्यासाठी प्रत्येक मालिकांमध्ये चढाओढ ही सुरूच असते. याशिवाय अनेकदा टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहायचं म्हणून मालिकेत चित्रविचित्र ट्विस्ट आणले जातात. यातले काही फसतात तर काही ट्विस्ट प्रेक्षकांना मनापासून आवडतात. आता या TRP शर्यतीत सलग दुसऱ्यांदा अरुंधतीने नंबर मिळवला आहे. अर्थात आई कुठे काय करते या मालिकेने आपला नंबर वन टिकला आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत नुकताच एक ट्विस्ट आला आहे. हा ट्विस्ट पाहून प्रेक्षकांनी पुन्हा एकदा मालिका आणि मालिकेतील मुख्य पात्र अरुंधतीला डोक्यावर घेतल आहे. गेल्या काही आठवड्यात आई कुठे काय करते या मालिकेचा TRP बऱ्यापैकी घसरला होता. अगदी दुसऱ्या तिसऱ्या आणि अगदी पाचव्या नंबरपर्यंत मालिकेची घसरण पाहायला मिळाली. यानंतर अखेर आई कुठे काय करते या मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आणि मालिकेने TRP चा उच्चांक गाठला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, यावेळी जाहीर झालेल्या TRP लिस्टनुसार ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा घसरलेला TRP परत वाढला आहे. नुसता वाढला नाही तर हि मालिका TRP च्या शर्यतीत अव्वल ठरली आहे. तर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेनेदेखील आई कुठे काय करते मालिकेचे शेजारी पद भूषविले आहे. जाहीर झालेली TRP लिस्ट हि आठवड्याचा TRP दर्शविणारी आहे.