Take a fresh look at your lifestyle.

लडाखमध्ये प्रदूषण प्रसाराचा आरोप आमिर खानला अमान्य; सोशल मीडियावर AKPकडून स्पष्टीकरण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान गेल्या काही दिवसांपासून दुस-या पत्नीसोबत सहमतीने घटस्फोट घेतल्याच्या वृत्तामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्यातच भर म्हणून सोशल मीडियावर लडाखमधील काही असे व्हिडीओ शेअर झाले कि आमिर खान आणि एकेपी टीमवर आरोपांचा भडिमारचं झाला. हे प्रकरण असे कि, ‘लाल सिंग चड्ढा’ या आगामी चित्रपटाचे आमिर व त्याची टीम लडाखमध्ये शूटींग करत आहे. दरम्यान हे शूटिंग करताना चित्रपटाच्या टीमने गावात सर्वत्र कचरा पसरविला आहे आणि प्रदूषण वाढवले आहे असा आरोप स्थानिकांनी केला आणि तेही अगदी पुराव्यानिशी. त्यानंतर आमिर खानच्या मिस्टर परफेक्शनिस्ट असण्यावर अनेको प्रश्न उभे राहिले. या सर्व प्रकरणाबाबत अखेर आमिरने एकेपी प्रोडक्शनच्या ट्विटर हॅण्डलवरून स्पष्टीकरण दिले आहे.

लडाखमधील वाखा गावात हे शूट सुरु असून या गावातील हा कचरा पडल्याचे दृश्य या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. गावात सर्वत्र प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा सर्वत्र विखुरलेला या व्हिडीओत स्पष्ट दिसत असल्यामुळे आमिरच्या प्रोडक्शनवर आरोप होत होते. आता या आरोपांना आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसकडून उत्तर देण्यात आले आहे. हि पोस्ट ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, आमिर खान व संपूर्ण टीमवर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. आम्ही एक कंपनी या नात्यानं शूटींगचे स्थळ आणि आजुबाजूच्या परिसराच्या स्वच्छतेबाबत अगदी कडक प्रोटोकॉल पाळतो. संपूर्ण ठिकाण कचरा मुक्त असावे, याबाबत आमची टीम दक्ष असते.

 

पुढे, दरदिवशी शूटींग संपल्यानंतर संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते. शेड्यूल संपल्यानंतर शूटींग स्थळ सोडण्यापूर्वी त्या परिसराची पूर्ण स्वच्छता केली जाते. पूर्ण स्वच्छता झाल्यानंतरच आम्ही रवाना होतो. आम्ही कचरा पसरवला, हा आरोप त्यामुळेच आम्हाला अमान्य आहे. आमचे शूटींग लोकेशन्स संबंधित स्थानिक अधिका-यांसाठी खुले आहेत. ते वाटेल तेव्हा पाहणी करू शकतात, असं आमिर खान प्रॉडक्शनने त्यांच्या सोशल मीडियावर जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये नमूद केलेले आहे.