Take a fresh look at your lifestyle.

शाहरुख -अमीर दिसणार एकत्र ; लाल सिंग चड्डा मध्ये शाहरुख साकारणार ही भूमिका

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान सध्या दुबईमध्ये राहत आहे, परंतु चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो दिल्ली मध्ये आला आहे. वास्तविक, शाहरुख खान आमिर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे, ज्याच्या शूटिंगसाठी तो राजधानी दिल्लीला पोहोचला आहे. बातमीनुसार, आमिर खानने या चित्रपटात शाहरुखचा एक पार्ट डायरेक्ट केला आहे.शुटिंग संपल्यानंतर दोघेही एकत्र ड्रिंकचा आनंद घेताना दिसले.

मुंबई मिररच्या म्हणण्यानुसार, शाहरुख खानची फर्म, लालसिंग चड्ढा चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्ट सांभाळत आहे. हा चित्रपट फॉरेस्ट गंप या इंग्रजी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच त्याने त्याच्या भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबरमध्ये पूर्ण होणार आहे.

कोरोनाव्हायरसमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढील वर्षी 2021 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. त्याचवेळी शाहरुख खानने त्याच्या पुढील चित्रपटाविषयी चाहत्यांना अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. ‘झिरो’ (2018) चित्रपटानंतर त्याने कोणताही चित्रपट किंवा कोणतीही घोषणा केली नाही. मात्र, वृत्तानुसार शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटात दिसू शकतो. यात दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.