Take a fresh look at your lifestyle.

अमीर खानने केलं ‘लक्ष्मी बॉम्ब’च कौतुक ; म्हणाला की आणखी वाट पाहू शकत नाही

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmmi Bomb) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. लक्ष्मी बॉम्बच्या ट्रेलरने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकची खूप प्रशंसा होत आहे. त्यातच आता अभिनेता अमीर खानने लक्ष्मी बॉम्बची प्रशंसा करताना अक्षय कुमारच कौतुक केले आहे.हा चित्रपट पाहण्यासाठी आता मी आणखी वाट पाहू शकत नाही असं म्हणत त्याने अक्षयवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

आमिर खानने लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर ट्विटरवर शेअर करत अक्षय कुमारचं कौतुक केलं आहे. आमिरने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, प्रिय अक्षय कुमार, लक्ष्मी बॉम्बचा ट्रेलर शानदार आहे.मित्रा आता मी हा चित्रपटा पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित व्हायला हवा होता. या चित्रपटातला तुझा परफॉर्मन्स जबरदस्त आहे. तुमच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा!

आमिर खानने शुभेच्छा दिल्यानंतर अक्षयने आमिरचं ट्विट रिट्विट केलं. यावेळी अक्षयने भावुक प्रतिक्रिया दिली. अक्षयने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, प्रिय आमिर खान, तुझ्या या शब्दांनी मला अधिक प्रोत्साहन दिलं आहे. या अवघड समयी तुझे हे शब्द माझ्यासाठी खूप मोठे आहेत. माझ्या मित्रा तुझ्या या शब्दांनी माझ्या मनाला स्पर्श केला आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ (Laxmmi Bomb) चा धमाका होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर 9 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असला तरी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएईमध्ये चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार निर्माते करत आहेत. 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’