Take a fresh look at your lifestyle.

‘या’ ठिकाणी करीना कपूरला Hug करताना दिसला आमिर खान

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड स्टार आमिर खान सध्या आपला आगामी सिनेमा लाल सिंह चड्ढाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यासाठी तो अमृतसरला जात आहे. अशात अशी माहिती समोर आली आहे की, आमिर सेटवरच आपला 55 वा वाढदिवस साजरा करणार आहे.

दरम्यान शनिवारी (14 मार्च 2020) आमिर खानचा वाढदिवस आहे. या सिनेमात आमिरसोबत करीना कपूर देखील दिसणार आहे. अलीकडेच आमिर खान आणि करीना कपूर मुंबईतील प्रायव्हेट एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. यावेळी त्यांचे अनेक फोटो समोर आले जे व्हायरल होताना दिसले.

आमिर खानला एअरपोर्टवर भेटल्यानंतर दोघांनीही एकमेकांना हग केलं आणि एकमेकांचा निरोप घेतला. लुकबद्दल बोलायचं झालं तर दोघंही कॅज्युअल लुकमध्ये दिसून आले. आमिर आणि करीनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.