Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ऐकलं का..? ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे निराश आमिर देश सोडणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 24, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Lalsinghchaddha
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेइंडस्ट्रीत खूप वर्ष मेहनत करून कसून आपलं नाव कमावणाऱ्या अनेक कलाकारांना सध्या बॉयकॉट मोहिमेमुळे त्रास होत आहे. यामध्ये बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान तर होरपळून निघताना दिसतो आहे. त्याचा यशस्वी होईल अशी पूर्ण खात्री असलेला ‘लाल सिंग चड्ढा‘ हा चित्रपट भारतात अक्षरशः आपटला. बॉक्स ऑफिसच्या इतिहासात आमिरचा हा पहिलाच चित्रपट इतक्या सपशेल पडला असेल. अशावेळी निर्माते, दिग्दर्शक आणि अगदी कलाकारांच्या मनाला काय वाटलं असेल ते सांगणंही मुश्किल आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून काहीच धड कमाई करू शकला नाही. या बॉयकॉटला आमिर जबाबदार असल्याचे अनेकांनी म्हटले. यानंतर आता आमिर खानविषयी मोठी बातमी समोर आली आहे.

#AamirKhan to take 2 month break in US after #LaalSinghChaddha's #boxoffice failure?https://t.co/342t1Y5ziE

— DNA (@dna) August 23, 2022

बॉलिवूड अभिनेता आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या अपयशानंतर फारच हताश आणि निराश झाला आहे. त्यामुळे तो मोठ्या विश्रांतीचा विचार करतोय. अशी चर्चा आहे कि, तो लवकरच मोठा ब्रेक घेऊन देश सोडणार आहे. होय. जवळपास २ महिन्यांसाठी तो भारत देश सोडून अमेरिकेला जाणार आहे, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा २०२२ मधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. शिवाय दीर्घ काळानंतर आमिर रुपेरी पडद्यावर झळकला होता. शिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान सलग सुट्ट्यादेखील होत्या. पण तरीही प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ वळवली आणि अखेर हा चित्रपट फ्लॉप झाला.

View this post on Instagram

A post shared by Filmyamit (@filmy.amit)

रिपोर्टनुसार, अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट तब्बल १८० कोटी रुपयांमध्ये बनलेला बिग बजेट चित्रपट आहे. पण या चित्रपट पहिल्या वीकेंडला फक्त ४५.८३ कोटीचं कमाई करू शकला. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. शिवाय आमिर खान प्रचंड ट्रोल होत होता आणि यानंतर बॉयकॉट बॉलिवूड अशी मोहीमदेखील सुरु झाली.

AAMIR KHAN: Instead of wasting Rs.25 worth milk packet on Shivling, donate that money or milk to poor people.
——–
INDIAN🇮🇳 BHAKT's: Instead of wasting Rs.250 on your movie ticket, we will donate that money to poor people.#LaalSinghChaddha #AamirKhan

— 🇮🇳RamThackeray (@RamThackeray) August 24, 2022

त्यामुळे आमिर खान कोशात गेला असून तो दोन महिन्यांसाठी अमेरिकेला जाणार आहे. याशिवाय मागील ३ वर्षांपासून तो अद्वैत चंदन दिग्दर्शित एका चित्रपटात काम करत आहे. एव्हढ्या नामुष्कीनंतर लगेच दुसरा चित्रपट करण्याची आपली मानसिकता नसल्याचे सांगत यापूर्वी मला काही काळ आराम करायचा आहे, असे आमिरने म्हटले आहे.

Tags: aamir khanDNAInstagram PostKareena Kapoor-khanlalsingh chaddaTwitter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group