Take a fresh look at your lifestyle.

आस्ताद काळेचा नवा ट्रेंड; आता सगळ्यांना उत्तरे द्यावी लागणार #चला प्रश्न विचारूया

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देशभरात दररोज नवनवे मुद्दे आणि त्या मुद्द्यांवर वाद विवाद होत असतात. अश्यावेळी काही जण आपली पोळी खरपूस भाजण्याच्या तयारीत असतात. तर काही जण इतरांच्या हक्कासाठी बोलताना स्वतःचे हात पोळून घेतात. अश्या अनेक मुद्द्यांवर परखडपणे भाष्य करणारे कित्येकजण असतात. या कित्येकांमध्ये काही कलाकारांचा देखील समावेश आहे. आस्ताद काळे हा अभिनेता ह्या कलाकारांपैकी एक आहे. तो नेहमीच विविध विषयांवर आपले मत पूर्ण विचारानिशी मांडत असतो. कधी न्यायासाठी तर कधी हक्कासाठी आणि कधी कधी तर थेट सरकार आणि राजकारण्यांच्या स्वयंघोषित सकारात्मक मुद्द्यांवर तो चांगलेच ताशेरे ओढताना दिसतो. यावेळी आस्तादने चला प्रश्न विचारूया असा हॅशटॅग सुरु केला आहे. दरम्यान काही तासांपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट देखील केलेली आहे.

आस्तादने #चला प्रश्न विचारूया हा हॅशटॅग वापरून सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतोय, ‘आत्ता महाराष्ट्रातील ‘नगर”सेवकां”‘चा पगार (सरकारी पगार) हा फारफारतर रुपये २५०००/- इतका आहे. ए ग्रेड म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधल्यांचा. ज्यात पुणे, मुंबई, आणि नागपूर येतात. आता पुण्यात, मुंबईत मी खूप राहिलोय. २५००० रुपयांत हे असं राहणीमान नाही हो परवडत!!! फॉर्च्युनरचा हफ्ताच ३००००/- वगैरे असेल!!(जर द्यायचा असेल तर अर्थात!!) #चलाप्रश्नविचारुया

आस्तादच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. कुणी आस्ताद ला उस्ताद म्हटले आहे, तर कुणी हे प्रश्न त्यांना विचारणार कोण? आणि किती जणांना? असा सवाल उभा केला आहे. एकंदर समाजातील विविध पैलूंवर भाष्य करणारा आस्ताद यावेळी थेट सरकारच्या सरकारी कारकुनांवर थेट निशाणा साधताना दिसतोय. इतकेच नव्हे तर सामान्य नागरिकांना पडणारे प्रश्न अगदी सरळ आणि सोप्प्या भाषेत तो मांडू पाहतोय. यामुळे आस्तादच्या चाहत्यांकडून त्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे चित्र त्याच्या पोस्टवर पडणाऱ्या कमेंट्समधून दिसत आहे.

अभिनेता आस्ताद काळे याच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं झालंच तर नुकताच तो कलर्स मराठी वरील ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत पहायला मिळाला होता. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्या आधी आस्तादने अनेक मराठी मालिकांमध्ये नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिजनमध्येदेखील आस्ताद आपल्या कणखर व्यक्तिमत्वामुळे प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. याशिवाय तो लवकरच संजय जाधव यांच्यासोबत त्यांच्या वेबसीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. शूटिंगला अद्याप सुरूवात झालेली नाही, मात्र सध्या ऑनलाइन वर्कशॉप सुरू आहेत अशी माहिती मिळत आहे.