आया रे झुंड!; बहुप्रतीक्षित ‘झुंड’ चित्रपटातील पहिल्या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट ‘झुंड‘ हा येत्या ८ मार्च २०२२ रोजी रिलीज होणार आहे. दरम्यान व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी यातील पहिले गाणे रिलिज झाले आहे. ‘आया ये झुंड है’ असे बोल असलेले हे गाणे अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. तर अतुल गोगावलेने हे गाणे गायले आहे. या गाण्याला रिलीज होऊन अगदी काहीच तास झाले आहेत पण प्रेक्षकांनी मात्र या गाण्याला आपली विशेष पसंती दर्शवित उदंड प्रतिसाद दिला आहे.
आया रे झुंड हे नुकताच प्रदर्शित झालेलं गाणं आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी पसंती असल्याचे सांगितले आहे. यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पडलेल्या कमेंट पाहिल्या असत्या समजून येते कि या पहिल्याच गाण्याने अगदी धुमाकूळ घातला आहे. आधीच या चित्रपटाबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता होती. याचे कारण म्हणजे मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर यातील मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन दिसत आहेत. याशिवाय अजय अतुल हि जोडी इतकी हिट आहे आणि त्यांची गाणी डबल हिट. त्यामुळे हे गाणं तुफान गाजतंय.
या चित्रपटात झोपडपट्टीत राहणारी मुलं आणि त्यांचे क्रीडा प्रशिक्षक यांच्या भोवताली फिरणारे कथानक दर्शवले आहे. यात अमिताभ बच्चन हे क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडीत राहणाऱ्या गरीब मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलत असे याचे कथानक आहे. हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. हा सिनेमा विजय बारसे आणि त्यांचे शिष्य यांच्यावर आधारित आहे. नागराज मंजुळे यांनी हि कथा लिहिण्यासाठी तब्बल दोन वर्ष मेहनत केली आहे.