Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

देशमुखांच्या घरी परीचं आगमन; आईचा अपमान करणाऱ्या अभिला अनघाने दाखवली त्याची जागा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 19, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aai Kuthe Kay Krte
0
SHARES
4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ हि मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर आहे. मालिकेत अलीकडेच अनघाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होताना आपण पाहिले. या कार्यक्रमात अभिची आई म्हणजेच अरुंधती त्याच विवाह बाह्य प्रकरण उघड करते आणि याचा अनघाला त्रास होतो. अनघा आणि बाळाचा जीव धोक्यात येतो आणि याच खापर सगळेच अरुंधतीवर फोडताना दिसतात. अनघाला तातडीने रुग्णालयात नेले जाते. आधीच तिच्या गरोदरपणात अडचणी असल्यामुळे सगळेच घाबरून जातात. पण अखेर अनघा आणि बाळ सुखरूप असल्याचे मालिकेत दाखविले आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अनघाची प्रसूती झाली असून तिला मुलगी झाल्याचे दाखवण्यात आले आहे. अनघाच्या जीवाला आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होण्याचे कारण स्वतः अभीचा बाहेरख्यालीपणा असला तरीही त्याने याचे खापर आईवर फोडले आहे. ज्या आईने एकेकाळी अभिला संकटातून वाचवलं तोच अभि आज आईचा उठता बसता अपमान करताना दिसणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभि अरुंधतीचा अपमान करताना दिसेल आणि यावेळी अनघा मध्ये पडून अभिला त्याची जागा दाखवून देईल. हा रंजक भाग लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by marathi serial (@marathi_serials_shorts)

व्हायरल प्रोमोनुसार अभि आणि अनघा आपल्या चिमुकल्या लेकीला घेऊन देशमुखांच्या घरी येतात. तिच्या येण्याने घरातले सगळेच आनंदी असतात. यावेळी अरुंधती पुढे येते आणि अनघा आणि बाळाची दृष्ट काढायला लागते. इतक्यात अभि स्वतःच्या आईला अडवतो आणि म्हणतो कि, ‘जिची दृष्ट लागते तिनेच दृष्ट काढली तर काय फायदा..’. अरुंधतीचा अपमान होताच अनघा मध्ये पडते आणि अभिला खडे बोल सुनावते. अनघा म्हणते कि ‘ही फक्त तुझी मुलगी नाही.. माझीही आहे’ आणि अरुंधतीच्या हातात बाळाला देते.

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram PostPromo Videostar pravahviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group