Take a fresh look at your lifestyle.

मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे झळकणार बावरा दिल या हिंदी मालिकेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री अभिज्ञा भावे हि मराठी अभिनेत्री असून तिने विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘तुला पाहते रे’ मालिकेतील मायरा हि भूमिका प्रेक्षकांना इतकी भावली होती कि मालिका संपल्यानंतरही मायरा प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अभिज्ञा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. कधी फोटो तर कधी व्हिडीओ आणि सोबतच आपल्या चालू किंवा आगामी मालिकांबाबत ती प्रेक्षकांना सोशल मीडियाद्वारेच कळत असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर आगामी मालिकेतील लूक शेअर केला आहे. अभिज्ञा कर्लस हिंदी चॅनेलवर बावरा दिल या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती जान्हवी नावाची भूमिका साकारणार असल्याची माहिती सोशल मीडियावर तिने दिली आहे.

याआधी अभिज्ञाने २०१० साली ‘प्यार की ये एक कहानी’ या हिंदी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिने अनेक मराठी मालिकांमध्येही काम केले आहे. गेल्यावर्षी ती रंग माझा वेगळा या मालिकेत झळकली होती. अभिज्ञाच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. खास करून हि वेब सिरीज तरुणाईसाठीचे विशेष आकर्षण झाली होती. तर तुला पाहते रे या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत तिने साकारलेली भूमिका तर प्रेक्षक आजही विसरू शकलेले नाहीत.

‘बावरा दिल’ हि मालिका मराठी मालिका जीव झाला येडा पिसा चा हिंदी रिमेक आहे. जीव झाला येडा पिसा या मालिकेने नुकताच काही दिवसांपूर्वी मालिकेचा निरोप घेतला आहे. दरम्यान या मालिकेचे विविध मालिकांमध्ये रिमेक पाहायला मिळत आहेत. हि मालिका कलर्स मराठीवर प्रसारित व्हायची. तर बावरा दिल हि मालिका कलर्स हिंदी या वाहिनीवर प्रसारित होत आहे. या मालिकेत अनेक मराठी कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. मराठी मालिकेच्या या हिंदी रिमेक मालिकेला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

 

अभिज्ञा गेल्या जानेवारी महिन्यात विवाह बंधनात अडकली. अभिज्ञाच्या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून ‘क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे. इतकेच नव्हे तर अभिज्ञाच्या कामाचा तो नेहमीच आदर करतो व नवनवीन प्रोजेक्टसाठी तिला प्रोत्साहित करीत असतो.