Take a fresh look at your lifestyle.

चाहत्यांकडून कॅन्सरग्रस्त पतीच्या तब्येतीची विचारपूस; व्यक्त होताना गहिवरली अभिनेत्री

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत ओळखीचा आणि आवडीचा चेहरा असलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे हि गेल्या काही काळापासून वैयक्तिक कारणांमुळे सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. मात्र तिचे चाहते तिच्या अपडेट नेहमीच घेत होते. जानेवारी २०२१ मध्ये तिने मेहुल पै सोबत लग्न केले. लग्नाला वर्षही झाले नाही तोच मेहुलला कॅन्सर असल्याचे समोर आले. यामुळे अभिज्ञा कोलमडली होती. मेहुलवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. यानंतर आता अभिज्ञा खूप दिवसांनी इंस्टा लाईव्ह आल्यानंतर तिच्या चाहत्यांनी मेहूलच्या तब्येतीची विचारपूस केली. हे पाहून अभिज्ञा गहिवरले आणि भावुक होत तिने पतीच्या तब्येतीविषयी माहिती दिली.

या इन्स्टा लाईव्ह मध्ये एका चाहत्याने अभिज्ञाला विचारलं कि, “घरचे कसे आहेत”? त्यावर अभिज्ञा भावूक झाली आणि म्हणाली, “मी काही महिन्यांनंतर इंस्टाग्रामवर LIVE येण्याचा निर्णय घेतला. कारण मी माझ्या वैयक्तिक समस्यांमध्ये व्यस्त होते. मला बरं वाटत नव्हतं. पण आता मला वाटतं की मी ठीक आहे.” मेहुलच्या प्रकृतीविषयी विचारणाऱ्यांना तिने सांगितलं, “तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीसाठी तुमचे आभार. घरी सर्वजण ठीक आहेत. मेहुलसुद्धा ठीक आहे. मेहुल बरा होत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कदाचित एक-दोन महिन्यांत तो पूर्णपणे बरा होईल. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर मला तुमच्या प्रेमाची गरज आहे. तुमचं प्रेम नेहमी माझ्यासोबत राहू द्या.”

याआधी मेहुलने रुग्णालयातील फोटो पोस्ट करत आपल्या आजराची माहिती दिली होती. ‘माझ्या आयुष्यात मला अनेक मूर्ख भेटले, परंतु कर्करोग हा त्यापैकी सर्वांत मोठा आहे. मला माफ कर, पण तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस.’ या पोस्टमूळे मनोरंजन सृष्टीत मोठी खळबळ उडाली होती. मात्र धाडसी पत्नी होऊन अभिज्ञाने हि वेळ व्यवस्थित सारली आणि आज पुन्हा एकदा चाहत्यांच्या संपर्कात आली आहे. अभिज्ञा सध्या ‘तु तेव्हा तशी’ या मालिकेत पुष्पावल्ली ही नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारतेय. या मालिकेत स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळस्कर यांच्या मुख्य भूमिका आहेत.