Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘शाहरुखने माझी हेअरस्टाईल चोरली..’; भाईजाननंतर आता ‘पठाण’ला भिडला बिचुकले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 29, 2022
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Bichukale_SRK
0
SHARES
88
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषिक सिजनमध्ये साताऱ्याचा डंका गाजवलेला अभिजित बिचुकले तुम्हाला आठवत असेलच ना!! आता एव्हढे राडे करून बसलेली व्यक्ती आठवणार नाही असं कस होईल.. विविध मुद्द्यांवर थेट बोलणे, वाट्टेल त्याला भिडणे हा जणू त्याचा छंदच आहे. बिग बॉस मराठीत असताना बिचुकले शो होस्ट मांजरेकरांना अनेकदा भिडताना आपण पाहिला. पण बिग बॉस हिंदीतून बाहेर पडल्यानंतर त्याने भाईजानसोबत जो पंगा घेतला त्या बद्दल तर कायचं बोलणार.. असले १०० सलमान गल्ली झाडायला ठेवतो म्हणत भिडणारा बिचुकले आता बॉलिवूडच्या ‘पठाण’ला अर्थात शाहरुख खानला नडला आहे.

View this post on Instagram

A post shared by abhijeetbichukale15 (@abhijeetbichukale15)

त्याच झालं असं कि, सध्या सोशल मीडियावर आणि विविध स्तरांवर अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी चित्रपट ‘पठाण’विषयी निषेध नोंदविला जात आहे. सर्वत्र वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच साताऱ्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना अभिजित बिचुकले म्हणाला, ‘मला वाटतं की शाहरुख खान बिग बॉस हा शो बघत होता. त्यात माझी हेअरस्टाइल बघून त्याने पठाणमधील लूकसाठी तो कॉपी केला. शाहरुखचा पठाण चित्रपटातील लूक माझ्यासारखाच आहे. पण ही एक सकारात्मक बाब आहे.’

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

पुढे म्हणाला, ‘मी लहान असताना १९९१ मध्ये संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तचे तसे लांब केस होते. तेव्हा ती हेअरस्टाईल खूप लोकप्रिय झाली होती. पण आता २०२२ मध्ये जी हेअरस्टाइल लोकप्रिय झाली आहे, ती माझी आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

सलमान खानचा बिग बॉस हा शो शाहरुखने बघितला असावा. त्यामुळे त्याने पठाण चित्रपटात केलेली हेअरस्टाइल माझीच आहे’. आता असा गजब दावा करून अभिजित बिचुकलेला काय मिळालं ते माहित नाही. पण सोशल मीडियावर पुन्हा एक नवा विषय ट्रोलर्सला चघळायला मिळाला हे मात्र नक्की!

Tags: Abhijeet BichukleInstagram PostPathanShahrukh KhanViral Statement
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group