Take a fresh look at your lifestyle.

अभिजित बिचुकलेंना कोरोनाची लागण; बिग बॉस 15’च्या घरातली एंट्री हुकली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच बिग बॉस १५च्या विकेंड वारमध्ये घरात तुफान येणार वादळ येणार अशी चर्चा रंगली होती. हे तुफान वादळ म्हणजे काय तर घरामध्ये तीन तगड्या जोरदार आणि हटके अश्या वाईल्ड कार्ड एंट्री होणार होत्या. आता होत्या म्हणायचं कारण असं कि या एंट्रीपैकी २ एंट्री लांबल्या आहेत तर १ एंट्री कॅन्सल अर्थात रद्द करण्यात आली आहे. होय. बिग बॉसच्या घरात रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले अशा तीन दमदार वाईल्ड कार्ड एंट्री होणार होत्या. मात्र ऐनवेळी बिचुकलेंना कोरोनाची लागण झाल्यामुळे सगळा डाव उधळला.

‘बिग बॉस मराठी’मध्ये आणि सातारा जिल्यात राजकारणामध्ये ज्यांनी सगळ्यांच्या शिट्ट्या गुल्ल केल्या अक्षरश: धुमाकूळ घालून सगळ्यांना हैराण करणारे अभिजित बिचुकले ‘बिग बॉस १५’मध्ये येणार म्हटल्यावर त्यांच्या समर्थकांची काही औरच कॉलर टाईट होती. पण आता नो राडा. कारण ‘बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री घेण्याआधीच बिचुकले कोरोनाच्या जाळ्यात अडकले आणि त्यांची एन्ट्री रद्द करण्यात आली. शिवाय रश्मी व देवोलिना यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आल्यामुळे त्यांची एंट्री लांबणीवर गेल्याचे स्पष्ट होत आहे.

‘बिग बॉस १५’च्या मेकर्ससाठी हि बाब फार मोठा धक्का मानला जात आहे. कारण आधीच टीआरपीच्या शर्यतीत ‘बिग बॉस १५’ तोंडावर पडतो का काय असे असताना टीआरपी वाढवण्यासाठी मेकर्स कायकाय युक्त्या लढवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे वाईल्ड कार्ड एन्ट्री. पण अश्या परिस्थिती ऐनवेळी वाईल्ड कार्ड थांबणे निश्चितच टीआरपीसाठी मोठा लॉस आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता अभिजित बिचुकलेंची जागा एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत घेणार आहे. मुख्य म्हणेज ती एकटी नाही तर तिच्या पतीसोबत घरात एंटर होणार आहे. त्यामुळे आता ‘बिग बॉस १५ ला राखी सावंत तारणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.