Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस 15’च्या घरात सत्तेचे वारे वाहणार?; विकेंडच्या वारमध्ये अभिजित बिचुकले गृहप्रवेश करणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १५मध्ये व्हीआयपी झोनच्या परिचयानंतर शोचा टीआरपी चांगलाच पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता निर्मात्यांनी काही माजी स्पर्धकांना घरातील सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी घरात पाठवण्याची एक विशेष योजना आखली आहे. मुख्य म्हणजे यासाठी आता बिग बॉस १५ मध्ये बिग बॉस १३ फेम रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करतील. इतकेच नव्हे तर त्यांच्यासोबत बिग बॉस मराठी २’चे माजी स्पर्धक आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्य गाजवणारे राजकारणी अभिजीत बिचुकलेसुद्धा या शोमध्ये प्रवेश करणार आहेत. याशिवाय ‘बिग बॉस १३ मधील पारस छाब्रा देखील प्रतीक्षेत असेल. अभिजित बिचुकले यांनी त्यांच्या फेसबुक अधिकृत पेजवर हा प्रोमो शेअर केला आहे.

या विकेंडला ‘बिग बॉसच्या घरात नुसते एकवार एक आश्रयाचे धक्के बसतील. कारण आता बिग बॉसच्या घरात ३ जबरदस्त तुफान अश्या वाइल्ड कार्ड्स रविवारी मध्यरात्री घरात प्रवेश करणार आहेत. पण दर्शकांना हि एंट्री सोमवारच्या एपिसोडमध्ये दाखवली जाईल. इतकेच नाही तर शो चा होस्ट सलमान खान प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे थोडा चलबिचल असल्यामुळे विकेंडच्या वारचे काही वेलचीचे सूत्र हे ‘बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर सांभाळतील. त्यामुळे हा विकेंड नक्कीच स्पेशल असणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमो व्हिडिओत, पहिल्याच दिवशी अभिजीत, रश्मी आणि देवोलीना यांच्यात मतभिन्नतेवर शब्दयुद्ध झाल्याचे दिसत आहे. त्याच झालं असं कि, होस्टने घरात गेल्यानंतर तुमच्या टार्गेटवर कोण असेल असे विचारल्यानंतर देवोलिनाने विशाल कोट्टीयनचे नाव घेतलं. तर रश्मीने प्रतीक सेहेजपालचे नाव घेतले आणि अभिजित यांनी नेहा भसीन. शिवण यांची नाव घेताना प्रत्येकाने आपापलं कारण दिल.

दरम्यान अभिजित यांनी नेहा भसीनच्या वागण्यावर प्रश्न उभा करत म्हटले कि, “संस्कार कमी आहेत”. हे ऐकून देवोलीना भडकली आणि एकही मिनिट वाया न घालवता तिने विचारले कि,” मग तुम्ही इथे का आलाय? जिथे संस्कार कमी आहेत असे तुम्हाला वाटते”. यावर अभिजीत उत्तर देताना म्हणाले“मी सर्वांना ठीक करण्यासाठी आलो आहे.” त्यामुळे आता खरोखरच हे पाहणे औत्सुक्याचे असेल कि या विकेंडला घरात काय काय तडके बसणार आहेत.