Take a fresh look at your lifestyle.

अक्की अंकलच्या निधनाने अभिषेक बच्चन झाला भावुक; म्हणाला..,

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच ७५वा आंतरराष्ट्रीय कान फिल्म फेस्टिवल सुरु झाला आहे. या महोत्सवाला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या कलाकारांमध्ये हॉलिवूड सह बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश होता. या चित्रपट महोत्सवात अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची लेक आराध्य अभिषेक बच्चन देखील सामील झाली होती. या महोत्सवाला हजेरी लावल्यानंतर जेव्हा अभिषेक पत्नी आणि मुलीसह भारतात परतला तेव्हा मात्र त्याला अतिशय दुःखद बातमी मिळाली. हि बातमी होती अक्की अंकलच्या निधनाची. त्यांच्या निधनाने अभिषेक अतिशय भावुक झाला आणि त्याने आपल्या भावना व्यक्त करीत एक पोस्ट लिहिली आहे.

प्रसिद्ध सूट स्टायलिस्ट अकबर शाहपुरवाला यांच्या निधनानंतर अभिषेकने आपल्या भावना व्यक्त करणारी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अकबर यांचे बच्चन कुटुंबीयांसोबत अतिशय सलोख्याचे असे जवळचे नाते होते. अमिताभ बच्चन यांचे सगळे सूट्स तेच शिवायचे. इतकंच काय तर अभिषेक लहान असताना त्याचा पहिला सूटसुद्धा अकबर यांनीच शिवला होता आणि आजही त्याचे सूट तेच शिवत असे. अकबर यांना तो ‘अक्की अंकल’ म्हणूनच हाक मारायचा आणि आज त्याच अक्की अंकलचे निधन झाल्याची बातमी ऐकून तो भावुक झाला आहे.

त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘घरी आल्यावर अत्यंत दुःखद बातमी समजली. फिल्मी जगतातील एक महान व्यक्ती अकबर शाहपुरवाला यांचं निधन झालं. मी त्यांना अक्की अंकल म्हणायचो. त्यांनी माझ्या वडिलांचे अनेक पोशाख बनवले. जेवढं मला आठवतंय, त्यांनी माझ्या वडिलांचे आणि माझेसुद्धा अनेक सूट्स शिवले २ आहेत. माझ्या चित्रपटांसाठी त्यांनी सूट्स तयार केले. त्यांनी माझा पहिला सूट शिवला होता, जो मी रेफ्युजी या चित्रपटाच्या प्रीमिअरला परिधान केला होता. अजूनही तो सूट मी जपून ठेवला आहे’. ‘जर तुमचा पोशाख किंवा सूट कचिन्स आणि त्यानंतर गबाना यांनी बनवला असेल, तर तुम्ही स्टार झालात असं समजा. एवढा त्यांचा फिल्म इंडस्ट्रीत प्रभाव होता. जर त्यांनी स्वत: तुमच्या सूटचा कापड कापला असेल, तर त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं समजायचं. ते मला नेहमी म्हणायचे की, सूटचं कापड कापणं म्हणजे फक्त शिवणकाम नाही, तर त्या भावना आहेत. जेव्हा तू माझा सूट परिधान करतोस, तेव्हा त्यातील प्रत्येक धागा, शिलाई ही प्रेमाने आणि माझ्या आशीर्वादाने विणलेली असते. माझ्यासाठी ते जगातील सर्वोत्कृष्ट सूट मेकर होते. आज मी तुम्ही शिवलेला सूट परिधान करेन, अक्की अंकल. तुमच्या आत्म्याला शांती लाभो’!