हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बंटी और बबली’ या सिनेमाने १८ वर्षांपूर्वी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसले होत. तर या सिनेमातील ‘कजरा रे’ या लोकप्रिय ठरलेल्या गाण्यात अभिषेक बच्चन आपल्या बायको आणि वडिलांसह थिरकताना दिसला होता. या आयकॉनिक गाण्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी एकत्र ठुमके लगावत प्रेक्षकवर्ग खुळावून सोडला होता. याच गाण्यावर आता अभिषेक बच्चन नोरा फतेहीसोबत थिरकताना दिसला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीआयवर तुफान व्हायरल होत आहे.
आजही ‘कजरा रे’ या गाण्याचे क्रेझ कायम आहे. अनेक पार्टी, इव्हेन्ट आणि वेडिंग सोहळ्यात हे गाणं वाजवलं जात. इतकंच काय तर सेलेब्स इव्हेन्टसाठी देखील या गाण्यावर परफॉर्म केले जातात. त्यातच आता अभिषेक बच्चन आणि नोरा फाटेही यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये हे दोघे ‘कजरा रे’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. वांद्रे येथील एका कार्यक्रमात अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते. यावेळी नोरा आणि अभिषेकदेखील उपस्थित होते. याच कार्यक्रमात नोरा आणि अभिषेक यांनी ‘कजरा रे’ या गाण्यावर थिरकण्याचा आनंद घेतला आहे.
अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्राम स्टोरीत हा व्हिडिओ शेअर केला आहे. रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी हा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचे या व्हिडिओवर लिहिले आहे. ज्यामध्ये नोरा आणि अभिषेक यांच्यासह अनेकजण पार्टीमध्ये ‘कजरा रे’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. मात्र पूर्ण लक्ष वेधून घेतलं ते नोरा आणि अभिषेक यांनीच. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अभिषेकला ‘बायको कुठेय तुझी..?’, ‘इथे ऐश्वर्या का नाहीये..?’, ‘बायकोला सोडून हिच्यासोबत का नाचतोय..?’ असे सवाल केले आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, नोरा फतेही आणि अभिषेक बच्चन हे दिग्दर्शक रेमो डिसूजाच्या पुढील डान्स प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. ज्याचे शूटिंग संपल्यानंतर आयोजित केलेल्या पार्टीमधील हा व्हिडीओ आहे.
Discussion about this post