बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी NCB’च्या कारवाईला वेग; फिल्मी स्टाइल फरार झालेला अभिनेता अटकेत
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉलिवूड विश्वात अनेक अश्या घडामोडी घडताना दिसत आहेत ज्यांचा प्रभाव थेट इंडस्ट्रीवर होत आहे. आजकल चित्रपटांपेक्षा विविध मुद्द्यांवरच चर्चा जास्त होताना दिसत आहे. दरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणांबाबत NCB कडून कारवाई सुरूच आहे. या कारवाईला सध्या चांगलाच वेग आला आहे. कारण आता पुन्हा एकदा NCB’ ने टीव्ही कलाकारांवर कारवाईचा चाबूक ओढला आहे. दरम्यान यावेळी NCB ने टीव्ही जगतातील ओळखीचा चेहरा अभिनेता गौरव दीक्षित याला अटक केली आहे.
https://twitter.com/Bollyhungama/status/1431519669395939349
अभिनेता गौरव दिक्षित याला ड्रग्ज प्रकरणात NCB ने कारवाई करीत अटक केली आहे. तर काही महिन्यांपूर्वी गौरवच्या घरात NCB ने छापेमारी केली असता या छापेमारीत MD ड्रग्स, चरस आणि दूसरे काही ड्रग्स सापडले होते. छापेमारीत सापडलेले हे अमली पदार्थ कारवाईदरम्यान जप्त करण्यात आले होते. काही मीडिया वाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, NCBची टीम त्याच्या फ्लॅटमध्ये छापेमारी करीत असताना इमारतीच्या खालूनच गौरव दीक्षित फरार झाला होता. यानंतर अखेर त्याला अटक झाली आहे. टीव्ही मालिका आणि चित्रपट कलाकार एजाज खान याच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारावर गौरव याला अटक करण्यात आली आहे.
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत एक नाही तर कित्येक मोठी नावं समोर आली आहेत. त्यामुळे NCBकडून कारवाईचा वेग चांगलाच वाढला आहे. या ड्रग्ज प्रकरणात बिग बॉगचा स्पर्धक असलेला एजाज खान याच्या चौकशीदरम्यान गौरव दीक्षित याचं नाव समोर आलं होतं. तर एप्रिल महिन्यात गौरव दीक्षित याच्या घरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले होते. एप्रिल महिन्यात मुंबई लोखंडवालामधील गौरवच्या फ्लॅटवर छापेमारी करण्यात आली होती. यावेळी तो घरात नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार तो एका परदेशी नागरिकत्व असणाऱ्या महिलेसोबत या फ्लॅटमध्ये वास्तव्य करीत होता.