Take a fresh look at your lifestyle.

सर्दीच्या गोळ्यांनी केला घात, बॉलिवूडच्या टारझनचा कार अपघात; पत्नीसह मुलगीही गंभीर जखमी

0

हॅलो बॉलिऊड ऑनलाईन। ‘टारझन‘च्या भूमिकेला न्याय दिलेले दिग्गज अभिनेते हेमंत बिर्जे यांचा अपघात झाला आहे. काल म्हणजेच ११ जानेवारी २०२२ रोजी मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर त्यांच्या गाडीचा दुर्दैवी अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तब्येतीच्या अस्वस्थेमुळे आणि वाढलेल्या गारठ्यामुळे झालेल्या सर्दीसाठी औषधी गोळ्यांचे सेवन करून अभिनेता गाडी चालवत होता. दरम्यान गाडी चालविताना गोळ्यांच्या प्रभावामुळे अभिनेत्याच्या डोळ्यावर झापड आली आणि हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात अभिनेता, त्याची पत्नी अमना आणि मुलगी रेश्मा गंभीर जखमी आहेत. सध्या ते एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

अभिनेते हेमंत बिर्जे हे मुंबईत राहतात. सध्या बदललेल्या हवामानामुळे त्यांना सर्दी झाली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पुण्याच्या घरी जायचे नियोजन केले होते. दरम्यान मंगळवारी सकाळी हेमंत बिर्जे, त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत पुण्याला जायला निघाले होते. जाण्यापूर्वी बिर्जे यांनी सर्दीसाठी २ गोळ्या घेतल्या आणि ते त्यांच्या गाडीतून पुण्याकडे निघाले होते. दरम्यान ते स्वत:च आपली गाडी चालवत होते. लोणावळ्याच्या पुढे आल्यानंतर उर्से टोल नाक्याजवळ हेमंत यांच्या डोळ्यावर झापड आली. मात्र तरीही ते डोळे ताणत गाडी चालविण्याचा प्रयत्न करीत होते. पण अखेर त्यांच्या डोळ्यावर झापड आली आणि त्यांचा गाडीवरचा पूर्णपणे ताबा सुटला. अखेर त्यांची गाडी डिव्हायडरला जाऊन जोरात धडकली.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर काही काळ वाहतूक संथ झाली होती. काही वेळाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहनांची वाहतूक व्यवस्थित झाली. तर या अपघातात हेमंत बिर्जे, त्यांच्या पत्नी आणि मुलगी जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान त्यांनी खाल्लेल्या औषधांचा प्रभाव इतका तीव्र होता कि त्यांना गुंगी आली आणि काही काळासाठी ते प्रवास करत आहेत हेच विसरले. मात्र दैव बलवत्तर म्हणून काळाच्या तोंडी जाता जाता बचावले. पण एकंदरच या अपघातामूळे औषधे खाऊन गाडी चालवणे कसे धोक्याचे आहे हे लक्षात येते. त्यामुळे हि चूक आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्या.