Take a fresh look at your lifestyle.

सुशांतच्या आत्महत्येमुळे हा अभिनेता अस्वस्थ ; म्हणाला रात्री झोपही लागत नाही

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सध्या सीबीआय आणि एनसीबीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं गूढ अजून स्पष्ट झालेलं नाही. याच दरम्यान अभिनेता अध्ययन सुमन याने सुशांत प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “सुशांत माझा मित्र नव्हता, मी त्याला ओळखतही नव्हतो परंतु तरीही सुशांतबाबत विचार करुन मी अस्वस्थ होतो.सुशांतचा सतत विचार केल्यामुळे आता मला झोप देखील लागत नाही.” असं तो म्हणाला.

अध्ययन सुमनच्या ‘आश्रम’ या सीरिजच्या निमित्ताने एनडीडीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अध्ययनने सुशांत आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं. तो म्हणाला, “सुशांतचा मृत्यू ही अत्यंत दुदैवी घटना आहे. त्याच्या मृत्यूची बामती ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता. सुशांतला मी ओळखत नव्हतो. त्याला कधी भेटलोही नव्हतो. पण त्याचे काही चित्रपट पाहिले होते. तो खरंच एक उत्तम अभिनेता होता. माणूसकीच्या नात्याने मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतं. तसंच चौकशीत जी काही माहिती समोर येतेय त्यामुळे मला अस्वस्थ व्हायला होतं. रात्रीची झोप देखील लागत नाही. मला खात्री आहे सीबीआय या प्रकरणातील खरे गुन्हेगार लवकरच शोधून काढेल.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’