Take a fresh look at your lifestyle.

क्रिमिनल जस्टीसच्या आगामी सिजनमध्ये चंद्राच्या दौलतरावांची वर्णी; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत अलीकडेच गाजलेला मराठी चित्रपट चंद्रमुखी अजूनही चर्चेत आहे. या चित्रपटातून एक वेगळी भूमिका साकरल्यानंतर आता अभिनेता आदिनाथ कोठारे एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. मागील वर्षात आदिनाथने एक वेगळीच झेप घेत सिनेसृष्टीत पाय घट्ट रोवले आहेत. विविध भूमिकांमधून आदिनाथ प्रेक्षकांसमोर आला आहे. यानंतर आता लवकरच आदिनाथ एका प्रसिद्ध वेबसिरीजचा भाग होताना दिसणार आहे. हि वेब सिरीज आहे अभिनेता पंकज त्रिपाठी यांची क्रिमिनल जस्टिस.

‘क्रिमिनल जस्टीस’ हि अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध वेबसिरीजपैकी एक आहे. याची दमदार झलक नुकतीच समोर आली आहे. ज्यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे देखील दिसला आहे. त्याच्या भूमिकेवर अद्यापही अधिकृतपणे प्रकाश टाकण्यात आलेला नाही. मात्र तरीही एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये मराठी चेहरा झळकणार हि अभिमानाची बाब असल्यामुळे हि बातमी चर्चेत आहे. याशिवाय आदिनाथने सोशल मीडियावर या सिरीजचा ट्रेलर शेअर केला आहे. क्रिमिनल जस्टीसमध्ये पंकज त्रिपाठी हे वकिलाची भूमिका साकारत असून हि भूमिका त्यांच्यासाठी फार मोठी संधी ठरली आहे. या भूमिकेमूळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे.

यानंतर आता आदिनाथ क्रिमिनल जस्टिस सिरीजमध्ये दिसणार आहे. त्यामुळे तो कोणत्या भूमिकेत असेल आणि त्याची भूमिका कशी असेल याबाबत सगळेच उत्सुक आहेत. आदिनाथच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, अलीकडेच ‘चंद्रमुखी’ चित्रपटात त्याने साकारलेली दौलतराव हि भूमिका प्रचंड गाजली आहे. पहिल्यांदाच एखाद्या राजकारण्याच्या भूमिकेत आदिनाथ दिसल्यामुळे प्रेक्षकांनी त्याची हि भूमिका उचलून धरली.