Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या भावाचे निधन

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | 2020 हे वर्षच बॉलीवूड साठी अनलकी ठरलं आहे. अनेक बॉलीवूड कलाकार यावर्षी जग सोडून गेले आहेत. त्यातच आज प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा भाऊ दिग्दर्शक अनिल देवगणचा मृत्यू झाला आहे. भावाच्या निधनाने देवगण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अजय देवगनने आपल्या सोशल मीडियावर आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी दिली आहे.

अजय देवगणने आपला भाऊ अनिलचं निधन झाल्याचं ट्वीट केलं आहे. काल रात्री आपल्या भावाचं निधन झालं. त्याच्या अशा अचानक जाण्याने आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे असं अजय देवगण म्हणाला.

अनिल देवगण हा प्रसिद्ध दिग्दर्शक होता. त्याने राजू चाचा, ब्लॅकमेल, हाल ए दिल अशा फिल्मचं दिग्दर्शक केलं आहे. तसंच सन ऑफ सरदार फिल्ममध्ये तो क्रिएटिव्ह डायरेक्टर होता. अनिलने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. फूल और काँटे, प्यार तो होना ही था अशा फिल्मसाठी तो सहाय्यक दिग्दर्शक होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.