हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे संकट काळात मदतीसाठी धावला आहे.अक्षय कुमारने आसाम पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत केली आहे.आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी यासंदर्भात ट्विट करून अक्षयचे आभार मानले आहेत.याआधी अक्षयकुमारने बिहार साठीही 1 कोटी रुपये दिले होते.
Thank you @akshaykumar ji for your kind contribution of ₹1 crore towards Assam flood relief. You have always shown sympathy and support during periods of crisis. As a true friend of Assam, may God shower all blessings to you to carry your glory in the global arena.
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) August 18, 2020
अक्षयने याआधीही अनेकदा संकट काळात गरजू लोकांना मदत केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यातही अक्षयने ओडिशा सरकारला फानी चक्रीवादळावेळी 1 कोटींची मदत केली होती. अक्षयने पीएम केअर फंडसाठी 25 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली होती, त्यावेळी मुंबई पोलीस फाऊंडेशनसाठी 2 कोटी आणि बीएमसीसाठी 3 कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’