Take a fresh look at your lifestyle.

‘खिलाडी’ अक्षयकुमार पूरग्रस्तांसाठी पुन्हा एकदा धावला ; केली ‘ही’ मदत

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे संकट काळात मदतीसाठी धावला आहे.अक्षय कुमारने आसाम पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत केली आहे.आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी यासंदर्भात ट्विट करून अक्षयचे आभार मानले आहेत.याआधी अक्षयकुमारने बिहार साठीही 1 कोटी रुपये दिले होते.

अक्षयने याआधीही अनेकदा संकट काळात गरजू लोकांना मदत केली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यातही अक्षयने ओडिशा सरकारला फानी चक्रीवादळावेळी 1 कोटींची मदत केली होती. अक्षयने पीएम केअर फंडसाठी 25 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली होती, त्यावेळी मुंबई पोलीस फाऊंडेशनसाठी 2 कोटी आणि बीएमसीसाठी 3 कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Comments are closed.