Take a fresh look at your lifestyle.

मुस्लीम असूनही गणपतीची पूजा का करतोस?? ‘या’ अभिनेत्याने दिलं जबरदस्त उत्तर

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सध्या देशभर गणेशोत्सव उत्साहात केला जातोय.कोरोनाच सावट असले तरी भक्तांचा उत्साह काही कमी होत नाही. गणेशोत्सव म्हटला की सगळीकडे आनंदाचं, चैतन्याचं वातावरण निर्माण होतं. अनेक मुस्लीम सेलिब्रिटी देखील गणपतीची पूजा करतात. मात्र त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील केली जाते. असाच काहीसा प्रकार अभिनेता आमिर अलीसोबत घडला आहे. मुस्लीम असुनही गणपती बाप्पाची पूजा का करतोस? असा प्रश्न विचारत काही टीकाकारांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. या ट्रोलर्सला त्याने जबरदस्त उत्तर दिलं आहे.

View this post on Instagram

All Is One ❤️

A post shared by Aamir Ali (@aamirali) on

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अमीरच्या घरी गणरायाचे आगमन झालं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र काही लोकांना ते रुचल नाही. तू एक मुस्लीम असूनही गणेशोत्सव कसा काय साजरा करतोस? असा प्रश्न विचारत त्याला काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या ट्रोलर्सला आमिरने चांगलंच प्रत्युत्तर दिले आहे. “होय मी एक मुस्लीम आहे, पण मला इतर धर्मांबाबतही तेवढाच आदर आहे. मी अल्लाहवर विश्वास ठेवतो. माझे काही मित्र इतर धर्मांवर विश्वास ठेवतात. पण त्यामुळे काहीही फरक पडत नाही. कारण सर्व धर्म शांती आणि प्रेमाचाच संदेश देतात.” अशा आशयाचं उत्तर त्याने या टीकाकारांना दिलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच मन जिंकून घेतल आहे.zzzzz

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’