Take a fresh look at your lifestyle.

पदार्पणाच्या चित्रपटात आमिर खानला मिळाली होती ‘इतकी’ फी ; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आपल्या लाल सिंग चड्ढा या नव्या चित्रपटाविषयी चर्चेत आहे. यात तो एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. आमिर खान गेली तीन दशके आपल्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या व्यतिरिक्त तो फिल्म इंडस्ट्रीच्या सर्वात महागड्या स्टार्सच्या यादीमध्ये गणला जातो, पण पहिल्या चित्रपटासाठी त्याला किती पगार मिळाला हे आपणास माहिती आहे काय??

आमिर खानने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटासाठी त्याला फारच कमी पैसे मिळाले. एका मुलाखती दरम्यान आमिरने आपल्या पहिल्या पगाराबद्दल खुलासा केला होता. तो म्हणाला, “कयामत से कयामत तक या डेब्यू चित्रपटासाठी मला केवळ 11 हजार रुपये दिले होते. मला दरमहा १ हजार रुपये फी दिली जात होती. मला असे वाटते की चित्रपटास पूर्ण होण्यास सुमारे 1 वर्ष लागला.

आमिरच्या ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट यापूर्वी 2020 च्या ख्रिसमसवर रिलीज होणार होता, पण आता 2021 च्या ख्रिसमसला प्रदर्शित होईल. आमिरच्या सोबत करीना कपूर या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘सीक्रेट सुपरस्टार’ फेम दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी केले आहे. आमिर आणि करीना व्यतिरिक्त मोनी सिंग देखील या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’