Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता अमोल धावडे यांचे कोरोनामुळे निधन; मित्र गमावल्याने प्रवीण तरडे झाले भावुक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. सिनेसृष्टीवर लागोपाठ या विषाणूने वार केला आहे. एकाच्या निधनाने सावरतोच तोवर आणखी एक दुःखद बातमी समोर येऊन थकलेली असते. नुकतेच अभिनेता अमोल धावडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामूळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जीव भावाचा मित्र गमावला आहे. मित्राच्या मृत्यूमुळे प्रवीण तरडे याना आपले अश्रू अनावर झाले. प्रवीण तरडे आणि अमोल धावडे यांनी एकमेकांसोबत अनेक चित्रपटांसाठी काम केले होते. दरम्यान त्यांच्यातील मैत्रीचे नाते आणखी घट्ट होत गेले. परंतु अर्ध्या वाटेत मित्राची साथ सुटल्याने तरडे पुरते कोलमडले आहेत.

अभिनेता रमेश परदेशी या घट्ट मित्रांपैकी एक आहेत. त्यांनीही जिवलग मित्राला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. सोबतच त्यांच्या ३० वर्षांच्या मैत्रीचे काही क्षण देखील पोस्ट केले आहेत. प्रवीण तरडे यांनी एक भावुक करणारी पोस्ट लिहिली आहे. यात ते लिहितात, माझा मित्र अमोल धावडे गेला. कोरोनाने आज एक निर्व्यसनी रोज व्यायाम करणारा धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या १५ दिवसात खाल्ला .. किती आठवणी ..? १९९६ साली मी लिहिलेल्या “आणखी एक पुणेकर ” या एकांकीकेत पहिला डायलॅाग याने म्हटला होता म्हणुन , माझ्या प्रत्येक सिनेमात एक तरी सीन अमोलसाठी लिहायचोच .. देवूळबंद , मुळशी पॅटर्न आणि आता सरसेनापती हंबीरराव प्रत्येक सिनेमात अमोल आहेच ..

 

११ मे ला अमोलचा वाढदिवस म्हणुन तिन्ही सिनेमांचं डबिंग आत्ता पर्यन्त त्याच्या वाढदिवसाला त्याच्या डायलॅाग ने सुरू करायचो .. हा माझा एक श्रध्देचा भाग होता.. खुप मोठा बांधकाम व्यवसायिक पण एका शब्दावर देईल तो सीन करायला यायचा .. १९९९ साली आपण पुरुषोत्तम जिंकला तेंव्हा तु कडकडून मारलेली मीठी कशी विसरू रे मित्रा .. एकत्र नॅशनल खेळलो , एकांकीका केल्या , सिनेमे केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास .. तुझा शेवटचा मेसेज होता ” बाय बाय प्रविण बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव ” राहिलाच शेवटी .. डोळ्यातील पाणी थांबत नाही ये रे आमल्या .. जिथे कुठे असशील सुखी राहा .. नाही तरी मी आणि पिट्या तुला “सुखी जीव “ असच म्हणायचो की .. सुखी राहा .. कुटुंबाची काळजी करू नको आम्ही आहोत मित्रा .