Take a fresh look at your lifestyle.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता अनिल कपूर आणि त्यांच्या पत्नीने शेअर केली खास पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील सगळ्यात तरुण ऍक्टर म्हणजे अनिल कपूर. अर्थात वयाने नव्हे तर मनाने ते नेहमीच चीरतरुण आहेत. काल अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता कपूर यांच्या लग्नाचा ३७ वा वाढदिवस होता. या खास दिवसाचे निमित्त साधून दोघांनीही मजेशीर अंदाजात सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा दिल्या. इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत त्यांनी एकमेकांवर असलेले निरंतर प्रेम जाहीर केले आहे. त्यांच्या या अंदाजाचे चाहत्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. इतकेच नव्हे तर ऍनिव्हर्सरी काल झाली असली तरीही शुभेच्छांचा पाऊस अजून सुरूच आहे.

अभिनेता अनिल कपूर याने दोघांचेही काही अनसिन फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तर सुनीता कपूर यांनी इंस्टाग्रामवर अनिल सोबतचा एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अनिल कपूर अगदी गुंग होऊन चालू मैफिलीचा आनंद लुटताना दिसत आहेत. अनिल कपूर यांच्या प्रसिद्ध गाण्यांपैकी एक ‘रमता जोगी’ या गाण्यावर ते थिरकताना दिसत आहेत. अनिलचा डान्स पाहून आजूबाजूला असणारे सारेच त्यांना चिअर करताना दिसत आहेत. हा मजेशीर व्हिडिओ शेअर करताना सुनीता यांनी कॅप्शनमध्ये लिहिले कि, “माझा पागल आणि वेडा नवरा. हे ३७ वर्ष शानदार बनवण्यासाठी धन्यवाद. माझे असचं मनोरंजन करत रहा. खूप सारं प्रेम.”

अनिल कपूर यांनीही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुनीता तसेच आपल्या संपूर्ण कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की,” आपलया प्रेमकहाणी समोर सगळ्या प्रेम कहाणी आणि प्रेमाचे शब्द खूप लहान भासतात. मला माहीत आहे, तू माझ्या सोबत असते तेव्हा सुरक्षित, प्रेम आणि आनंद दरवळत असतो. तू आमच्या कुटुंबाचा मजबूत खांब आहे. मला माहिती नाही जर तू आमच्या आयुष्यात नसशील तर आम्ही काय करू. संपूर्ण आयुष्य तुला खूप प्रेम आणि आदर देत राहीन. याची तू पात्र आहेस. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!”