Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही मला बोलवा,मी कधीही येईन; गुजराती भाषेत प्रश्न विचारणाऱ्या तरुणीला अनिल कपूरनी दिलं मराठीतून उत्तर

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरने त्याच्या आगामी Ak vs Ak या चित्रपटानिमित्त नुकताच सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन मला प्रश्न विचारा मी उत्तर देईन असं सांगत अनिल यांनी चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिलं. मात्र या सर्वांमध्ये त्यांचं एक उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कारण एका चाहतीने गुजरातीमध्ये विचारलेल्या प्रश्नाला अनिल कपूर यांनी थेट मराठीत उत्तर दिलं आहे.

युट्यूबर असणाऱ्या अदिती रावल या तरुणीने अनिल कपूर यांच्या AK vs AK या चित्रपटाचं कौतुक केलं. यामध्ये अनिल कपूर यांनी खूपच छान अभिनय केला आहे. पडद्यावर वावरताना ते अभिनय करत आहेत असं वाटतं नाही, अशा शब्दांमध्ये अदितीने गुजराती आणि इंग्रजी भाषेत अनिल कपूर यांचं कौतुक केलं. तसेच  तिने अनिल कपूर यांना मला तुम्हाला भेटून तुमची मुलाखत घेण्याची इच्छा आहे असंही म्हटलं. हा व्हिडीओ ट्विट करताना अदितीने तुम्ही एवढी ऊर्जा कुठून आणता असा प्रश्न अनिल कपूर यांना #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन विचारला.

अनिल कपूर यांनी या ट्विटला उत्तर देताना व्हिडीओमध्ये अदितीने व्यक्त केलेल्या मुलाखत घेण्यासंदर्भातील इच्छेवर भाष्य केलं. मात्र हे उत्तर देताना गुजराती तसेच इंग्रजीमधून बोलणाऱ्या अदितीला मुंबईकर असणाऱ्या अनिल कपूर यांनी मराठीमधून उत्तर दिलं. “तुम्ही मला कदीही बोलवा मी कधीही येईन” असं उत्तर अनिल कपूर यांनी या ट्विटला दिलं.

मात्र त्यावर अदितीने मला ही भाषा समजत नाही असं उत्तर दिलं होतं. अनिल कपूर यांच्या मराठी चाहत्यांनी अदिती गुजराती असल्याने ती गुजराती भाषेतून चित्रपटांचे परिक्षण करते. त्यामुळे मुंबईकर असणाऱ्या अनिल कपूर यांनी तिला मराठीत उत्तर दिल्याचं या ट्विटला रिप्लाय करुन म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.