Take a fresh look at your lifestyle.

मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण; ट्विटरवर दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात पुन्हा एकदा जखडु लागले आहे. यादरम्यान कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन विषाणूने आपले हातपाय पसरल्याने जगभराची चिंता भयंकर वाढली आहे. यात आता एकही असे क्षेत्र उरलेले नाही जिथे कोरोनाचा शिरकाव नाही. अलीकडेच अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर आता मराठी सिनेसृष्टीतील झकास अभिनेता अंकुश चौधरी यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. याबाबतची माहिती त्याने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

अभिनेता अंकुश चौधरीने ट्विटरवर ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. अंकुशने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॅाझिटीव्ह आली आहे. डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत आणि तुमचे आशिर्वाद आहेच. कोरोना वर मात करून पुन्हा त्याच जोशात आणि त्याच जोमात पुन्हा तुमच्यासमोर येईन. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी.

अभिनेता अंकुश चौधरींच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर. गेले अनेक तो चित्रपटसृष्टीपासून अंतर राखून होता. तर मधली २ वर्ष कोरोनामुळे सर्व काम ठप्प होते. यानंतर अंकुशने मराठी डान्सिंग रिऍलिटी शोचे परीक्षक पद भूषविले होते. यानंतर आता लवकरच त्याचा लकडाऊन हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अंकुश चौधरीसोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे कथानक ‘लॉकडाऊन’शी संबंधित असून हा चित्रपट अत्यंत मजेशीर आणि विनोदी असणार आहे. याशिवाय लवकरच वैदेही परशुरामी आणि सिद्धार्थ जाधवसोबत त्याचा लोच्या झाला रे हा विनोदी चित्रपट देखील येणार आहे. भरपूर दिवसानंतर अंकुशचा चित्रपट येणार म्हणून त्याचे चाहतेदेखील खुश आहेत.