Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता अर्जुन कपूरने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता अर्जुन कपूरने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचा प्रेक्षक वर्ग तयार केला. त्याचे काही चित्रपट हिट झाले पण काही चित्रपट मात्र अक्षरशः तोंडावर पडले. पण अगदी खरंच सांगायचं म्हटलं तर अर्जुन त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त अभिनेत्री मलायका अरोरासोबत असलेल्या रिलेशनशिपमूळे चर्चेत असतो. पण आता तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. अर्जुनने सोशल मीडियावर एका लहान मुलाचा फोटो पोस्ट करत मदत मागितली. हे इतके कारण त्याला ट्रोल करण्यासाठी पुरेसे आहे. मग काय अर्जुनने दिले उत्तर ते हि त्याच्या अंदाजात.

अर्जुनने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘हा लहान मुलगा गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्याच्या उपचारासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे मदत करा.’ असे त्याने लिहिले आहे. शिवाय डोनेशन लिंक पाठवली आहे. अर्जुनची ही पोस्ट पाहताच नेटकऱ्यांनी अर्जुनला चांगलाच पिळून काढायचे मनावर घेतलेले दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी तुला मदतीची गरज काय? असे म्हणत अर्जुनला ट्रोल केले आहे. ‘तुला मदत मागायची गरज काय? तुझी फक्त एका दिवसाची कमाई मुलावर खर्च कर, मुलाचा जीव वाचेल. असेही एका युजरने लिहिले आहे.

यावर अर्जुनने देखील ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. ‘माझी एक दिवसांची कमाई १६ कोटी असती, तर मला पोस्ट टाकायची गरज भासली नसती. मी १६ कोटींची मदत करू शकत नाही. माझ्या परीने मी सर्व मदत केली आहे. मुलाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तुम्ही देखील त्यांची मदत करू शकता. मला ट्रोल करण्यापेक्षा..’ असे म्हणत अर्जुनने ट्रोल करणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत.