Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांची कोरोनासोबतची झुंज झाली अपयशी; अखेर घेतला जगाचा निरोप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी मिळत आहे. दरम्यान ते ५२ वर्षांचे होते. अगदी काहीच दिवसांपूर्वी त्यातनं कोरोनाची लागण झाली होती. त्यांची सकारात्मकपणे कोरोनाशी झुंज सुरु होती. मात्र अखेर आज हि लढत थांबली आणि बिक्रमजीत यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी विविध चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ते केवळ एक अभिनेता नसून ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारी देखील होते.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तसेच ट्विटरवर पोस्ट करीत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले की, “आज सकाळी कोरोनामुळे अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारीदेखील होते. त्यांनी बऱ्याच चित्रपट आणि मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या होत्या. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांना मनापासून संवेदना ॐ शांती.”.

भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर बिक्रमजीत कंवरपाल यांनी २००३ साली आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीस सुरूवात केली. त्यांनी पेज ३, रॉकेट सिंगः सेल्समॅन ऑफ द ईअर, आरक्षण, मर्डर २, २ स्टेट्स आणि द गाजी अटॅक या सारख्या दर्जेदार चित्रपटात काम केले आहे. चित्रपटांशिवाय त्यांनी दीया और बाती हम, ये हैं चाहतें, दिल ही तो है या मालिकेत विविध भूमिका साकारल्या आहेत. तसेच बिक्रमजीत ‘२४’ या वेब सीरिजमध्ये अनिल कपूरसोबत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.