अभिनेते दिलीप कुमार यांचे दोन्ही भाऊ कोरोनाग्रस्त ; लीलावती रुग्णालयात दाखल
हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | सध्या जगभरात कोरोनाची दहशत जगभर पसरली. दररोज हजारो लोक या विषाणूचा बळी पडतायत. सर्वसामान्यांसह बॉलिवूड कलाकार तसेच राजकीय नेत्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. ताज्या बातमीनुसार दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचे भाऊ एहसान खान आणि अस्लम खान या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
दोघांनाही शनिवारी रात्री मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांचीही ऑक्सिजनची लेव्हल कमी होती. रिपोर्ट नुसार दिलीपकुमारची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी एहसान आणि असलमची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले.
दोन्ही भावांवर उपचार करत असलेले डॉक्टर जलील पारकर म्हणाले, “दोन्ही भावांना बाय-पॅप व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे आणि दोघे सध्या आयसीयूमध्ये आहेत. दोघांचं वय जास्त असून दोघेही आधीपासूनच रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, परंतु याक्षणी स्थिर आहे.