Take a fresh look at your lifestyle.

फरहान अख्तरने केले काँग्रेस नेत्याचे कौतुक आणि सोशल मीडियावर झाला पुन्हा एकदा ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर सध्या प्रचंड सक्रिय असलेला अभिनेता फरहान अख्तर आजकाल दररोजच ट्रोल होतोय असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. रोज नवनवीन मुद्द्यांवर तो व्यक्त होतो आणि युजर्स त्याला ट्रोल करतात. सध्या फरहानने भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांचे कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. हीच पोस्ट फरहानच्या ट्रोलिंगचे कारण बनली आहे. काँग्रेस नेत्यांचे कौतुक करतोस, तसे इतरांचे कौतुक का करत नाहीस? असा सवाल करीत त्याला नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात आले आहे.

फरहान अख्तरने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, ‘मी कधी श्रीनिवास बीव्ही यांना भेटलेलो नाही. पण ही महामारी संपताच मी नक्कीच तुम्हाला भेटेन आणि तुम्हाला मीठी मारेन.’ देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना श्रीनिवास बी.व्ही. यांनी आत्तापर्यंत आपल्या १ हजार कार्यकर्त्यांच्या मदतीने हजारो कोरोना रूग्णांना मदत केली आहे. कोरोना बाधित रुग्णांना आॅक्सिजन, प्लाज्मा पुरवण्यापासून ते रूग्णांला बेड मिळवून देणे, त्यांना रूग्णालयात भरती करणे, त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था करणे अशा स्वरूपात त्यांचे मदतीचे कार्य सुरू आहे. त्यांच्या या कार्याचे सध्या सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसेच अभिनेता फरहान अख्तरनेही त्यांचे कौतुक केले. पण फरहानने केलेले कौतुक अनेकांना रूचले असल्याचे काही दिसत नाही. अनेकांनी या ट्विटसाठी फरहानला ट्रोल केले आहे. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, त्याचा ‘तुफान’ हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हा सिनेमा चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.