Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड ही महाराष्ट्राची व मुंबईची देन – गोविंदाचे योगींना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेश मध्ये फिल्म सिटी उभारण्याचा चंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बांधला आहे. त्याची तयारीही सुरू झाली असून मुंबईतील सिनेसृष्टीतील मंडळींशी याबाबत चर्चा करण्यासाठी योगी मुंबईत आले होते. मुंबईत त्यांनी काही सिनेकलाकार आणि उद्योगपतीची भेटीगाठी घेऊन उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूकी साठी आवाहन केले. मुंबई फिल्मसिटीला उत्तर प्रदेशला हलवण्याच्या मुद्यावरून बराच राजकीय वाद पेटला होता. दरम्यान बॉलीवूड अभिनेता गोविंदाने यावर प्रतिक्रिया देताना योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिले आहे.

बॉलिवूड ही महाराष्ट्राची व मुंबईची देन असून याला उभं करण्यात शरद पवार सारख्या नेतृत्वाचा मोठा हातभार आहे. मुंबई अनेक उद्योग आणि विविधतेने नटलेले जागतिक दर्जाचे शहर आहे. महाराष्ट्र सार्वभौम असून महाराष्ट्राने देशाला कला, संस्कृती, इंडस्ट्री अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत’ असं म्हणत अभिनेता गोविंदाने योगी सरकारला प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परळीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेता गोविंदा आपल्या पत्नीसह यावेळी उपस्थितीत होता. त्या दरम्यान गोविंदाने योगी आदित्यनाथ यांना बॉलीवूड कोणीही मुंबईतून नेऊ शकत नाही असे म्हणत योगीना सुनावले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.