Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता ऋतिक रोशन करणार हॉलीवूड मध्ये एन्ट्री ; साकारणार ‘ही’ भूमिका

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | कहो ना प्यार है या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोचलेला आणि आपल्या जबरदस्त अभिनयाने तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता ऋतिक रोशनचे चाहते फक्त भारतातच नव्हे तर जगभर आहेत. ऋतिक रोशनची लवकरच हॉलीवूड मध्ये एन्ट्री होऊ शकते. हृतिकला हॉलिवूडमध्ये वर्कच्या ऑफर्स आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या मीडिया रिपोर्टनुसार हृतिक लवकरच आपल्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू शकेल.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ऋतिकच्या आगामी चित्रपटाबद्दलची माहिती समोर आली आहे. जवळपास आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ऋतिकने अमेरिकन मॅनेजमेंट कंपनी जर्स एजन्सी बरोबर करार केला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हॉलीवूडची दारे उघडली गेली आहेत. आता ऋतिक ज्या चित्रपटात त्यात तो एका स्पायच्या मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. तो चित्रपट क्राईम, थ्रिलर, प्रकारातला असून यासाठी ऋतिकची स्क्रीन टेस्टही घेण्यात आली आहे.

याशिवाय एक नामांकित कंपनी या चित्रपटाची निर्मात्याच्या भूमिकेत आहे. मात्र या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण असणार ही गोष्ट गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. अमेरिकेच्या एका स्टुडिओमध्ये काही कलाकारांची ऑडिशन पार पडली आहे. ऋतिकने त्याच्या राहत्या घरातून ऑडिशन रेकॉर्ड स्वरुपात पाठवली आहे. यासाठी ऋतिकला त्याच्या टीमकडून त्यासंबंधीचे डिटेल्स देण्यात आले होते. दोन आठवड्यापूर्वीच त्याने आपली ऑडिशन क्लिप संबंधितांना पाठवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.