Take a fresh look at your lifestyle.

अशा कृत्यानंतर स्टँडिंग ओव्हेशन कशाला..?; OSCAR’ मधील राड्यावर जिम कॅरे संतापला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारी द ऍकेडेमीचा अत्यंत मानांकित ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा जल्लोषात झाला. मात्र सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथने पत्नीची मस्करी करणाऱ्या निवेदक क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली आणि सोहळ्याला एक डाग लागला. यावरून विविध प्रतिक्रिया उमटत असताना अनेकांनी विलच्या कृतीचे समर्थन केले तर अनेकांनी विरोध. दरम्यान प्रसिद्ध कॅनेडियन- अमेरिकन अभिनेता जिम कॅरे याने या घटनेविषयी संताप व्यक्त केला आहे. त्याने समर्थन करणाऱ्या लोकांना कशाचंही कौतुक कराल का असा एक थेट प्रश्न विचारला आहे.

एका मुलाखती दरम्यान जिम या घटनेविषयी व्यक्त होत म्हणाला कि, “ज्याप्रकारे लोकांनी उभं राहून त्याचा सन्मान केला, त्याबद्दल मला चीड आहे. हॉलिवूडमध्ये परखड भूमिका न घेणाऱ्यांची गर्दी आहे आणि ही घटना म्हणजे खरंच या गोष्टीचे स्पष्ट संकेत आहेत की आता हॉलिवूड हा काही ‘कूल क्लब’ राहिलेला नाही.” क्रिसच्या जागी जर मी स्वत: असतो तर मी विलविरोधात २० कोटी डॉलर्सचा खटला दाखल केला असता. कारण तो व्हिडीओ सोशल मीडियावर कायम राहणार आहे. तो अपमान बऱ्याच कालावधीसाठी तसाच राहणार आहे. जर तुम्हाला गर्दीतून ओरडायचं असेल, ट्विटरवर राग व्यक्त करायचा असेल तर ठीक आहे. पण निवेदकाने काही वक्तव्य केल्याने मंचावर जाऊन त्याला थोबाडीत मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही.”

पुढे, “ मला असं वाटत कि, विलच्या मनात कुठलीतरी गोष्ट खूप वेळापासून खुपत असावी, ज्याचं रुपांतर त्या घटनेत झालं असावं. त्याच्याबद्दल माझ्या मनात द्वेष नाही. त्याने खूप चांगली कामं केली आहेत. मात्र ती घटना नक्कीच चांगली नव्हती. त्या रात्री प्रत्येकाच्या आनंदांच्या क्षणांवर ते विरझण टाकणारं कृत्य होतं. तो अगदीच स्वार्थी क्षण होता”. जिम कॅरे हा कॅनेडियन- अमेरिकन अभिनेता आहे. सोबतच तो एक कॉमेडियन, लेखक आणि निर्मातादेखील आहे. ‘द ट्रुमन शो’ आणि ‘मॅन ऑन द मून’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी तो प्रसिद्ध असून या दोन्ही चित्रपटांसाठी त्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला होता.