Take a fresh look at your lifestyle.

जर अर्णबला भारतात भीती वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये निघून जावे ; ‘या’ अभिनेत्याने सुनावले खडेबोल

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना दिवसांपूर्वी अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. अर्नब गोस्वामी तुरूंगात गेल्यापासून त्याचे चाहते सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत आणि त्यांच्या अटकेला विरोध करतात. राज्यातही यावरून वातावरण तापलं असून विरोधक ठाकरे सरकारवर टीका करत आहेत.

त्यातच न्यायालयाकडूनही गोस्वामी यांना दिलासा मिळालेला नाही, पोलीस आपल्याला मारहाण करत असल्याचा दावा गोस्वामी यांनी केला. दरम्यान, अभिनेता कमाल आर खानने ट्विट करत अर्णब यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याने ट्विटमध्ये ‘जर अर्णबला भारतात भीती वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये निघून जावे’ असे म्हटले आहे.

पुढे त्याने आणखी एक ट्विट केले आहे. ‘माझ्या जीवाला धोका आहे असे त्याने (अर्णब) बोलायला नको होते. त्याने देशातील न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा होता. तो नेहमी म्हणायचा की कोणाला भारतात भीती वाटत असेल तर त्याने पाकिस्तानमध्ये निघून जावे. आज तो स्वत: घाबरला आहे? का?’ या आशयाचे ट्विट केआरकेने केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.